Drinks For Healthy Bones : ठिसूळ झालेली हाडे बनतील मजबूत; हे ६ ड्रिंक्स रोज प्या, राहाल फिट

Food for Healthy bones : वाढत्या वयात हाडांशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी.
Drinks For Healthy Bones
Drinks For Healthy Bones Saam Tv
Published On

Natural Ways to Build Healthy Bones :

मजबूत हाडांसाठी संतुलित आहार हा अधित महत्त्वाचा असतो. बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सांधेदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कंबरदुखी आणि पाठदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

वाढत्या वयात हाडांशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. चांगल्या आहारासाठी कॅल्शियम अधिक गरजेचे असते. त्यासाठी आहारात कोणत्या ड्रिंक्स असायला हव्या. याविषयी जाणून घेऊया.

Drinks For Healthy Bones
World Heart Day 2023 : अधिक ताण घेतल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? कशी घ्याल आरोग्याची काळजी

1. अननसाचा रस

अननसाचा रस प्यायल्याने हाडे (Bones) निरोगी राहातात. चवीला आंबट-गोड असणाऱ्या अननसाचे आरोग्याला (Health) अधिक फायदे आहेत. अननसाच्या रसामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्याचा अपचन आणि संधिवात सारख्या आजारांवर (Diease) उपचार करण्यास मदत होते.

2. संत्र्याचा रस

संत्र्यामध्ये अधिक पोषकतत्व असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. याची चव देखील आबंट-गोड असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी संत्र्याचा रस फायदेशीर आहे. यात असणारे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

3. स्ट्रॉबेरी ज्यूस

भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असलेली स्ट्रॉबेरी ही हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन क, कॅल्शियम, मँगनीज, कॉपर, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com