World Heart Day 2023 : अधिक ताण घेतल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? कशी घ्याल आरोग्याची काळजी

Stress And Heart Health : काम आणि इतर समस्यांमुळे अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया याचा हृदयावर त्याचा कसा परिणाम होतो.
World Heart Day 2023
World Heart Day 2023Saam tv
Published On

Chronic Stress Can Cause Heart Trouble :

बदलेली जीवनशैली आणि धकाधकीचे जीवन याचा आरोग्यावर परिणाम होतो. कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप यामुळे शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच बहुतेकदा मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो.

आजकाल ताण, नैराश्य आणि चिंता यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. निरोगी राहाण्यासाठी केवळ आपले शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील चांगले असणे गरजेचे आहे. परंतु, काम आणि इतर समस्यांमुळे अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया याचा हृदयावर त्याचा कसा परिणाम होतो.

World Heart Day 2023
World Heart Day 2023 : छातीत दुखणे, सतत जळजळणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; असू शकतो गंभीर आजार

1. तणाव घेतल्याने हृदयावर कसा परिणाम होतो?

तणाव (Stress) हा हृदयाच्या संबंधित आजाराचे सर्वात मोठे कारण आहे. जास्त ताण घेतल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता अधिक असते. तणावामुळे हृदयाचे आरोग्य कमकुवत होते. दैनंदिन जीवनात जास्त ताण घेतल्यास आपली विचार करण्याची क्षमता अधिक कमकुवत होते. ज्याचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो.

2. तणाव घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात?

सतत ताण घेतल्यास हृदयावर ताण येतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो, शरीर सूजते, अस्वस्थता वाढते. हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी तणाव कमी करणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची (Health) काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

3. तणावावर मात कशी कराल?

  • तणावावर नियंत्रण ठेवण्यास निरोगी पदार्थ खा

  • व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या

  • काम करताना ते योग्य वेळेत कसे पुर्ण होईल हे देखील पाहा, ज्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com