Diabetes saam tv
लाईफस्टाईल

Diabetes: तुम्हीही ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपता? जडतील 'हे' भयंकर आजार

Reasons Of Increasing Diabetes: डायबिटीज हा आजार कधीच पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. परंतु हा आजार नियंत्रणात ठेवू शकतात. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला आहार आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या होतात. त्यात प्रामुख्याने ब्लड प्रेशर आणि मधुमेहाच्या समस्या होतात. मधुमेहाच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक वेळीच काळजी घेतात. खाण्यापिण्याचे पत्थे पाळतात. परंतु तरीही त्यांना मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागते. अपुरी झोप झाल्यानेदेखील मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

मधुमेहावर कोणताही इलाज नाही. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, हेल्दी लाइफस्टाइल, मानसिक आरोग्य आणि व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिल्याने मधुमेहाचा धोका टळतो.

रक्तातील साखर नियंत्रणात न राहण्याचे कारण

तुम्ही जर चांगली जीवनशैली, उत्तम आहार आणि व्यायाम करत असाल. तरीही तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर याचे कारण आहे अपुरी झोप. झोप न लागल्याने संपूर्ण दिनचर्येवर परिणाम होतो. त्यामुळे चांगला आहार, व्यायाम करुनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. अपुरी झोप घेतल्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.

झोप आणि मधुमेह वाढण्याचा संबंध

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आपले शरीर इन्सुलिन तयार करते. परंतु पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तातील इन्सुलिन तयार होण्यावर परिणाम होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही.

अपुरी झोप घेतल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. मधुमेह कधीच नियंत्रणात राहत नाही.

झोपेच्य कमतरतेमुळे रात्री आपल्याला खूप भूक लाते. त्यामुळे आपण अनेक पदार्थ खातो. चुकीच्या वेळी खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते.

एका अहवालानुसार, जे लोक ६ तासांपेक्षा कमी तास झोपतात. त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन

IAS Mittali Sethi: कोण आहेत नंदुरबारच्या IAS मिताली सेठी? दोन्ही मुलांचे घेतलेय सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन

SCROLL FOR NEXT