Tips For Sharpen Knife : किचनमधल्या चाकूची धार गेलीये, मग घरच्या घरी 'या' ट्रिक्स वापरा

Sharpen Knife : मिक्सर, कुकर यांच्याप्रमाणे सर्वाधिक वापर चाकूचा देखील वापर केला जातो. किचनमध्ये चाकू नसेल तर अनेक कामं तशीच राहतात. त्यामुळे किचनमध्ये चाकू महत्वाची काम करतो.
Sharpen Knife
Tips For Sharpen KnifeSaam TV

आपण दररोज विविध भाज्या आणि चमचमीत पदार्थ खातो. कोणतीही रेसिपी बनवताना मिक्सर, कुकर यांच्याप्रमाणे सर्वाधिक चाकूचा देखील वापर केला जातो. किचनमध्ये चाकू नसेल तर अनेक कामं तशीच राहतात. त्यामुळे किचनमध्ये चाकू महत्वाची कामं करतो.

Sharpen Knife
Kitchen Tips: आठवडाभर केळी फ्रेश ठेवायची आहेत? फॉलो करा 'या' टिप्स

विविध स्टाइलचे चाकू बाजारात बरेच महाग मिळतात. आता कितीही महागडा चाकू आणला तरी आठवडाभरात ते बोथट होतात, चाकूची धार निघून जाते. चाकूची धार गेल्यावर लगेचच दुसरा चाकू खरेदी करता येत नाही. त्यामुळे जेवण बनवताना भाज्या कापण्यात आणि विविध कामांमध्ये अडचणी येतात. त्यामुळे आज चाकूची धार पुन्हा कशी मिळवायची याच्या काही टिप्स पाहणार आहोत.

सिरेमिक मग

प्रत्येकाच्या घरी सिरेमिक कप असतातच. सिरेमिक कपच्या सहाय्याने तुम्ही चाकूची धार वाढवू शकता. यासाठी सिरेमिक कप आधी उलटा एका टेबलवर ठेवा. त्यानंतर या सिमेमिक कपवर चाकू दोन्ही बाजून घासा. असे केल्याने चाकू धारदार होईल.

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा वापरून सुद्धा तुम्ही चाकूला धार लावू शकता. त्यासाठी पाटा किंवा वरवंटा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चाकूच्या दोन्ही बाजू ५ मिनिटे यावर घासत रहा. त्याने देखील चाकूला छान धार लागते.

न्यूज पेपर

जर तुमच्याकडे पाटा वरवंटा आणि सिरेमिक मग नसेल तर तुम्ही न्यूज पेपरचा वापर करू शकता. त्यासाठी न्यूज पेपर घड्या करून घ्या. त्याच्यामध्ये चाकू घासून घ्या. न्यूज पेपरचे घर्षण झाल्याने देखील चाकूला धार लावता येईल.

Sharpen Knife
Kitchen Tips: 'या' घरगुती टिप्स फॉलो केल्यास दही आंबट होणार नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com