Health News Saam TV
लाईफस्टाईल

Health News : तुम्हीही सतत Instant नुडल्स खाता? वयाच्या पंचवीशीमध्ये दिसाल ३५ वयाचे, वाचा दुष्परिणाम

Eating Instant Noodles : सतत नुडल्स खाल्ल्याने प्रोटीन, मिनरल या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. प्रोटीन आणि फायबर नसल्याने आपल्याला काही दिवसांनी अशक्तपणा जाणवू लागतो.

Ruchika Jadhav

रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक व्यक्तींना जेवण बनवण्यासाठी वेळ नसतो. जास्त भूक लागल्यानंतर काही जण त्या वेळात झटपट इंस्टंट नुडल्स बनवतात. महाविद्यालयीन शिक्षणासाठी किंवा अन्य काही कामांसाठी तरुण मुलं मुली घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहतात. त्यामुळे ते अशा पद्धतीने इंस्टंट मॅगी नेहमीच खातात. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.

ब्लड प्रेशर

इंस्टंट नुडल्स बनवताना त्या नुडल्समध्ये आधीच जास्तीचं मीठ मिक्स असतं. जास्त प्रमाणातील मीठ आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याने शरिरातील सोडीअम जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. तसेच हाय ब्लड प्रेशरच्या समस्या वाढतात.

अन्न पचत नाही

इंस्टंट नुडल्स गहू ऐवजी मैद्यापासून बनवले जातात. मैदा पचायला जड असतो. असे नुडल्स खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं, गॅसच्या समस्या वाढतात आणि अन्न निट पचत नाही.

अशक्तपणा

ज्या व्यक्ती सतत असे पदार्थ खातात त्यांच्या शरीरात जास्त व्हिटॅमीन नसते. सतत नुडल्स खाल्ल्याने प्रोटीन, मिनरल या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. प्रोटीन आणि फायबर नसल्याने आपल्याला काही दिवसांनी अशक्तपणा जाणवू लागतो.

तुम्हालाही होतील हे आजार

आपण सुदृढ आणि निरोगी असण्यासाठी पोटभर जेवण केलं पाहिजे. त्यासाठी आधी सर्व पालेभाज्या, दूध, अंडी खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांना हे पदार्थ खाण्यासाठी जास्त वेळ नसतो.त्यामुळे ते फक्त इंस्टंट नुडल्सच खातात, त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. विविध रोग जडतात.डोके दुखी, दृष्टी कमी होणे, स्मृती जाणे, शरीराची हाडे कमजोर होणे अशा अनेक समस्या होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT