WHO Report On Head Phones 
लाईफस्टाईल

WHO: हेडफोनमुळे 100 कोटी तरुण बहिरे होणार; WHOचा धक्कादायक अहवाल

WHO Report On Head Phones: पुढच्या काळात तब्बल 100 कोटी तरूण बहिरे होणार आहेत...बसला ना तुम्हाला धक्का? हो. तुम्ही ऐकलं ते खरंय. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय. यात तुमचाही समावेश असू शकतो. नेमकं हे कधीपर्यंत आणि कशामुळे घडणार आहे? कोणत्या वयोगटातल्या तरुणांना ही समस्या येणार आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...आहे. पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हातात स्मार्टफोन आणि कानात हेडफोन हेच सर्रास चित्र तरुणांमध्ये दिसतं. गाणी ऐकणं, वेबसीरिज पाहणं या सगळ्यासाठी हेडफोन्स हवेच. काही जण प्रवासात, चालताना, व्यायाम करताना इतकंच काय तर घरातली कामं करतानाही तासनतास हेडफोन्स लावून असतात. काहींना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळेही हेडफोन्स वापरावे लागतात.

मात्र याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण जगातले तब्बल 100 कोटी तरुण बहिरे होणार आहेत. हा धक्कादायक अहवाल दुस-या-तिस-या कुणी नव्हे तर थेट WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. पुढच्या 25 वर्षांत म्हणजे २०५० पर्यंत जगातील तब्बल १०० कोटी लोक बहिरे होऊ शकतात असा इशाराच WHOनं दिलाय. या अहवालात नेमक्या काय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत, ते पाहूयात...

100 कोटी तरूण बहिरे होणार

हेडफोनमुळे 2050 पर्यंत 100 कोटी तरुण बहिरे होणार

जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

हेडफोनमुळे येत्या 25 वर्षांत 4 पैकी 3 जण बहिरे होणार

12 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक बहिरेपणाची समस्या

सध्या 12 ते 35 वयोगटातील 50 कोटी तरुण विविध कारणांमुळे बहिरे

या अहवालामुळे हेडफोन्स वापरण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हेडफोन्सचा वापर किती वेळ आणि कसा करावा यावर तज्ज्ञांनी काही सूचना केल्या आहेत ते पाहूयात.

हेडफोन्सबाबत काय खबरदारी घ्याल?

हेडफोन्स सलग अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वापरू नये. शक्य नसेल तर किमान कानांना मध्ये मध्ये विश्रांती जरूर द्या, असं तज्ज्ञ सांगतात. हेडफोन्सचा केवळ कानांवरच नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. हेडफोन्स किती वेळ वापरावेत, याचा कालावधी निश्चित करा. त्याचा आवाज किती असावा, याची मर्यादा ठरवा.

कामासाठी हेडफोन्स वापरावाच लागत असेल तर योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून भविष्यातल्या बहिरेपणाच्या धोक्यापासून तुम्हाला नक्कीच वाचता येईल.अन्य़था पुढील काळात 100 कोटी बहि-या तरुणांमध्ये तुमचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT