Headphones News : हेडफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा, VIDEO

world health organisation : हेडफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हेडफोन वापरणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे.

मुंबई : तुम्ही हेडफोन वापरत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात आता तरुण इयरफोन आणि इअरबड्सशिवाय राहत नाही. मात्र. या हेडफोनमुळे १०० कोटी तरुण बहीरे होणार आहेत, असा धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

हेडफोन वापरणे अत्यंत घातक आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. येत्या २५ वर्षांत म्हणजे तरुणांना बहिरेपणाची समस्या वाढणार आहे. या अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हेडफोनमुळे २०५० पर्यंत १०० कोटी तरुण बहिरे होण्याची शक्यता आहे. या हेडफोनमुळे २५ वर्षांत ४ पैकी ३ जण बहिरे होऊ शकतात. सध्या १२ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक बहिरेपणाची समस्या उद्भवू शके. तर सध्या १२ ते ३५ वयोगटातील ५० कोटी तरुण विविध कारणांमुळे बहिरे झाल्याचे अहवालात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com