Foods for dehydration, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Foods For Dehydration : शरीरात पाण्याची कमतरता वारंवार होतेय ? यांना आहारात द्या स्थान, होईल अनेक रोगांपासून सुटका

शरीरात पाण्याची कमतकता जाणवतेय तर या पदार्थांचा आहारात समावेश करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हायड्रेट राहणे खूप महत्वाचे आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या समस्या, डोकेदुखी आणि स्नायू पेटके होऊ शकतात.

हे देखील पहा -

हायड्रेट राहण्यासाठी आपण सतत पाणी किंवा ज्यूसचे सेवन करत असतो. हायड्रेटेड राहण्यासाठी साधे पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे असे बहुतेक लोक मानतात. परंतु, आपल्याला आहारात काही भाज्या व फळांचा समावेश केल्यास आपल्याला पुरेपूर पाणी मिळू शकते. तसेच त्यातून इतर पोषक तत्वे मिळू शकतात आणि त्यामुळे पाण्याची कमतरता निघून जाण्यास मदत होईल. फळे आणि भाज्यांचा सर्वात मोठा फायदा आपल्या शरीराला होत असतो. त्यात असणारे फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम आणि प्रथिने पाण्याच्या प्रमाणात असतात. कोणत्या फळे आणि भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते ते जाणून घेऊया.

१. संत्र्यामध्ये ८८ टक्के पाण्याते प्रमाण असते. तसेच यात फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्व क आणि अनेक रोगांशी लढणारे अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.

२. आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण ८३% पर्यंत असते. त्यात पोटॅशियम, जीवनसत्त्व ए, बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व क चे भांडार आहे.

३. अननासात पाण्याचे प्रमाण ८६ टक्के पर्यंत आहे. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि जीवनसत्त्व क अधिक प्रमाण आहे.

४. नासपतीमध्ये पाण्याचे प्रमाण हे ८८ टक्के असते. आपण त्याच्या पौष्टिक घटकांचा विचार केल्यास त्यात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त आहे. याव्यतिरिक्त जीवनसत्त्व ए, बीटा - कॅरोटीन व फॉस्फरसचा चांगला स्त्रोत आहे.

५. तुरईच्या भाजीमध्ये पाणी (Water) अधिक प्रमाणात असते. त्याच्या पौष्टिक मूल्यांबद्दल विचार केल्यास जीवनसत्त्व क चे प्रमाण जास्त आहे.

६. काकडीत पाण्याचे प्रमाणही अधिक असते व त्यात कॅलरीजही खूप कमी असतात. जीवनसत्त्व (Vitamins) क, पोटॅशियम व मॅग्नेशियम कमी प्रमाणात आहे. तसेच जीवनसत्त्व ए चा देखील चांगला स्त्रोत यात आढळून येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांचे दैवत वसंतराव नाईक यांच्या समाधीचे दर्शन झाले: बच्चू कडू

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT