Glycerine tips : चेहऱ्यासाठी वापरला जाणाऱ्या ग्लिसरीनचा उपयोग असाही !

ग्लिसरीनचा वापर कसा कराल हे जाणून घ्या
Glycerine tips, Kitchen hacks, Tips Tricks
Glycerine tips, Kitchen hacks, Tips Tricksब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : महिला अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापर करत असतात त्यातील एक ग्लिसरीन आहे. ग्लिसरीन हे क्लिन्झर, मॉइश्चरायझर किंवा टोनर आदी म्हणून उपयोगी होते.

हे देखील पहा -

ग्लिसरीनने आपल्या चेहऱ्यासोबत आपल्या घरातील इतर गोष्टीसाठी उपयोगी पडते,कसे ते जाणून घेऊया.

१. ग्लिसरीनने केवळ कोरडी त्वचाच काढून टाकू शकत नाही, तर आपण आपल्या जखमेवर देखील वापरू शकता आणि संसर्ग कमी करू शकता. आपल्याला चेहऱ्यावर जळजळ जाणवत असेल तर आपली ही जखम नक्की भरून काढण्यास मदत होईल.

२. आपल्या घरातील गलिच्छ काच ग्लिसरीनने स्वच्छ करू शकता.पॉलीओल कंपाऊंड असल्याने, घाण सहजपणे साफ केली जाते. यासाठी आपल्याला पाणी आणि डिटर्जंटमध्ये ग्लिसरीन घालून त्याचा वापर करु शकतो.

Glycerine tips, Kitchen hacks, Tips Tricks
Monsoon tips : पावसाळ्यात या वस्तू पाण्यात भिजल्यानंतर करा हे काम

३. आपल्याला पेंटिंगची आवड असेल तर आपण पेंटिंग कलरमध्ये ग्लिसरीन वापरू शकतो. पेंटिंगच्या कलरमध्ये याचा वापर केल्यास ती सुंदर दिसण्यास मदत होते.

४. आपल्या घरातील फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ग्लिसरीन वापर करु शकतो. यासाठी आपल्याला फक्त ग्लिसरीनच्या कुपीतून कापसातील ग्लिसरीन घ्यायचे आहे आणि फर्निचर स्वच्छ करायचे आहे. असे केल्याने आपले फर्निचर पूर्णपणे स्वच्छ होईल.

५. आपल्या स्वयंपाकघरातील भांडी जळली असतील तर आपण ग्लिसरीनच्या मदतीने ते स्वच्छ(Clean) करू शकता. यासाठी, आपल्याला डिशवॉशिंग लिक्विड आणि ग्लिसरीन एका भांड्यात ठेवावे लागेल आणि ते वापरावे लागेल. ग्रीस काढण्यासाठी आपण कोमट पाणी (Water) देखील वापरू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com