Health : जुलाब व उलटीमुळे सुद्धा होऊ शकते मूत्रपिंड खराब! SaamTvnews
लाईफस्टाईल

Health : जुलाब व उलटीमुळे सुद्धा होऊ शकते मूत्रपिंड खराब!

सध्या आपल्या सर्वांचीच जीवन शैली पूर्णपणे बदलली आहे. रासायनिक घटकांचा वापर केलेले अन्न ग्रहण केले जात आहे. यामुळे मानवी आरोग्यावर याचा कोणत्या प्रकारे विपरीत परिणाम काय होईल याची शाश्वती नाही.

विकास मिरगणे
अलीकडे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढायला लागली आहे. सर्वसामान्यपणे जुलाब किंवा उलटी सारखा आजार असल्या नंतर किडनी संबंधी काही आजार होतील असा सहजासहजी विचार केला जात नाही. म्हणून कोणत्याही आजारास सुरुवात झाल्या नंतर जलदगतीने उपचार घ्यावेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्ण असेल तर त्यांनी शेजारी असणाऱ्या मनपा, सरकारी रुग्णालयात जावे. पण, उपचारास कृपया प्राधान्य द्या. घणसोली मध्ये एका तरुणीचा मूत्रपिंड खराब होता होता वाचवण्यात आम्हाला यश आले आहे.
डॉ.किरण वळवी

नवी मुंबई : सध्या आपल्या सर्वांचीच जीवन शैली पूर्णपणे बदलली आहे. रासायनिक घटकांचा वापर केलेले अन्न ग्रहण केले जात आहे. यामुळे मानवी आरोग्यावर याचा कोणत्या प्रकारे विपरीत परिणाम काय होईल याची शाश्वती नाही. अशाच प्रकारची घटना एका तरुणी बाबत घणसोली येथे घडली. परंतु डॉ.किरण वळवी यांनी आपला अनुभव व तात्काळ पुढील तपासण्या करून मूत्रपिंडात होत असलेला बिघाड दूर करून त्या तरुणीचे मूत्रपिंड वाचविले आहे. आयुशी चारी ही घणसोली मधील सर्वसामान्य घरातील कन्या. हिला १९ ऑक्टोबर रोजी उलट्या व जुलाब होतात. म्हणून घणसोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

हे देखील पहा :

औषध उपचार करूनही सर्वसामान्य वाटणारा आजार बरा होत नाही. म्हणून त्यांनी दुसऱ्या एखाद्या खासगी किंवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यावेळी आरुषी हिच्या कुटुंबानीही आपल्या मुलीचा आजार बरा व्हावा म्हणून सकारत्मकता दाखविली व पुढील उपचार घेण्यासाठी आरुषीला घणसोली येथील क्रेडेन्स केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे आल्यानंतर डॉ.किरण वळवी यांनी तिची तपासणी केली.

तसेच काही तपासण्या बरोबरच आरएफटी ही किडणीची तपासणी देखील वेळीच केली. आरएफटी तपासणी मध्ये मूत्रपिंडाचा क्रियाटीन रेट पाच इतका होता. अर्थात सर्वसामान्य रुग्णांचा क्रियाटीन रेट हा १.२ आसपास असावा लागतो. परंतु आरुषीच्या मूत्रपिंडात बिघाड होऊन क्रियाटीन रेट हा पाच पर्यंत पोहचला होता. परंतु डॉ.किरण वळवी यांच्या समयसुचकतेने वेळीच तपासणी व अनुभव कामाला लावल्याने वेळीच उपचार केले गेले. त्यानंतर तीन दिवसाने आयुशीचा क्रियाटिन रेट एकच्या आसपास आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

SCROLL FOR NEXT