Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!
Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!SaamTvNews

Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!

चारित्र्याच्या संशयावरून पती ने पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल; शुक्रवारी सकाळी पत्नी झोपली असताना पतीने केलेले हे कृत्य!
Published on

-- मंगेश मोहिते

नागपूर : महिलांवर अनेक प्रकारे अत्याचार करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पण नागपूरच्या पाचपावली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पंचशील नगर मध्ये पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकल्याची गंभीर अन् धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

हे देखील पहा :

पीडित महिलेवर मेयो रुग्णालयात मध्ये उपचार सुरू असून ती 35 % भाजली आहे. आरोपी पती सतीश भिमटे पेंटिंग चे काम करतो. मागील चार महिन्यापासून तो बेरोजगार आहे. घरी पत्नी भावना व दोन मुले आहेत. भावना मोबाईल मध्ये व्यस्त असायची आणि रात्री ती आपल्या मित्रा सोबत मोबाईलवर बोलत राहायची. त्यावरून पत्ती-पत्नी मध्ये नेहमी वाद होत होते.

Nagpur : बापरे! चारित्र्याच्या संशयावरून झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल!
Pune : धक्कादायक! टेरेसवरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

त्यातूनच आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पत्नी पहाटे पाच वाजता झोपली असताना त्याचवेळी आरोपी पती सतीशने तेल गरम केले आणि उकळलेले तेल तिच्या चेहऱ्यावर टाकले. यात तिचा चेहरा गंभीररीत्या भाजला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com