आजकाल धकाधकीचे जीवन, व्यायामाचा आभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच उद्भवत आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा पाळल्याने लठ्ठपणा या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.
वाढत्या वजनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल,हाय ब्लड प्रेशर, हॉर्ट अटॅक यासारख्या गंभीर आजारांना बळी पडावे लागत आहे. एकाच जागी सतत बसून काम केल्याने ही समस्या आणखी वाढू लागली आहे. कामाच्या ठिकाणी चार ते पाच तास एकाच ठिकाणी बसल्याने लठ्ठपणा वाढतोय.यासाठी योग्य पद्धतीने बसल्याने शरीराला फायदा होणार आहे.
फिटनेस ट्रेनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर वज्रासन (Vajrasana) या स्थितीत बसावे. वज्रासनामध्ये बसल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया आणि ब्लड सर्क्युलेश चांगले होते. कामाच्या ठिकाणी एकाच जागी तासनतास बसून जे लोक काम करतात त्यांनी वज्रासन करणे फायद्याचे ठरेल.
पचनक्रिया होते सुरळीत
वज्रासन केल्याने अन्नाचे पचन सुरळीत होते. पोटाचे विकार दूर होतात.
२पाठदुखीपासून आराम
वज्रासन केल्याने स्नायू बळकट होतात. तसेच पाठदुखीपासून आराम मिळतो.
रक्तप्रवाह होतो सुरळीत
जेवल्यानंतर वज्रासन केल्याने पाय आणि मांड्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
मानसिक आरोग्य सुधारते
वज्रासन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते ताण तणाव दूर करण्यासाठी तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी वज्रासन करणे फायदेशीर ठरते.