Benefits of saffron water, Why Saffron Water Is Good For Body  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आरोग्यासाठी फायदेशीर केशरचे पाणी !

केशरचे पाणी अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात अनेक औषधी मसाले आढळतात. हे पदार्थ आपल्याला चवीसोबत आरोग्याला देखील फायदेशीर ठरतात.

हे देखील पहा -

बिर्याणीपासून ते गोड पदार्थात केशरचा वापर केला जातो. पदार्थाला चव आणण्यापासून ते त्याला रंग आणण्यासाठी केशर उपयोगी आहे. आपल्या स्वयंपाकघरात काही मसाले असे आहेत जे अत्यंत महागडे असतात पण त्याचा आपल्या आरोग्याला (Health) अनेक फायदे होतात त्यातील एक केशर. केशरमध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. केशरमध्ये समाविष्ट असलेले अँटिऑक्सिडंट आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवू शकतात. केशर पाण्याचे फायदे पाहूया

१. केशरमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील खराब पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून बचाव करतात. याचा फायदा आपल्याला त्वचेसाठी होऊ शकतो. त्यासाठी केशरचे पाणी प्यायला हवे. हे पाणी रोज प्यायल्यास आपली त्वचा गुळगुळीत व चमकदार होईल.

२. मासिक पाळीच्या वेदनेवर केशरचे पाणी (Water) अतिशय उपयुक्त ठरते. केशर हे मासिक पाळीतील अस्वस्थता आणि त्याची लक्षणे कमी करण्यासाठी तसेच हार्मोनल संतुलन राखण्यात मदत करते.

३. २० ते ४५ वयोगटातील महिलांना, चिडचिड, डोकेदुखी आणि वेदना यासारख्या पीएमएसच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी केशर अधिक प्रभावी ठरते. तसेच केशरचा वास घेतल्याने चिंता आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते.

४. केशर हे अँटिऑक्सिडेंटचे स्त्रोत म्हणून काम करते. जे आपल्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवू शकते. केशरचे पाणी मेंदूच्या पेशींचे वाढत्या नुकसानापासून संरक्षण करते, जळजळ कमी करते, भूक सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

SCROLL FOR NEXT