Skincare makeup cancer SAAM TV
लाईफस्टाईल

Skincare makeup cancer: सुंदर दिसण्याच्या नादात आरोग्य धोक्यात? स्किनकेअर आणि मेकअपमध्ये कॅन्सर होणाऱ्या केमिकल्सचा समावेश

skincare makeup cancer causing chemicals risk: सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाणारे स्किनकेअर आणि मेकअप उत्पादने आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये कॅन्सर निर्माण करणारी रसायने आढळतात.

Surabhi Jayashree Jagdish

स्किनकेअर आणि मेकअपचा वापर अनेक मुली करतात. काजळ, मस्कारा, लिपस्टिक, फाऊंडेशन असे अनेक प्रोडक्ट्स यामध्ये आपण वापरतो. मात्र अनेक महिला उत्पादनांच्या लेबलवर छोट्या अक्षरांत लिहिलेल्या घटकांकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण मे 2025 रोजी Environmental Science & Technology Letters मध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासाने सर्वांचे लक्ष वेधलंय.

या अभ्यासात उघड झालंय की, अनेक लोकप्रिय मेकअप आणि सेल्फ-केअर उत्पादनांमध्ये कॅन्सर निर्माण करणारं रसायन दिसून येतं. ज्यामुळे लाखो महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.

तुमच्या स्किनकेअरमध्ये लपलाय धोका

या अभ्यासात महिलांच्या आठवड्याभरातील स्किनकेअर रूटीनवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. यामध्ये मॉइश्चरायझर, शॅम्पू, कंडिशनर, लोशन, मस्कारा, आयलायनर, स्किन-लाइटनिंग क्रीम आणि अगदी आयलॅश ग्लू यांसारख्या उत्पादनांचा समावेश होता. सहभागी महिलांना त्यांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या घटकांची यादीचे फोटो पाठवण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे 53% महिलांनी अशा उत्पादनांचा वापर केला ज्यात फॉर्मल्डिहाइड किंवा फॉर्मल्डिहाइड सोडणारे प्रिझर्व्हेटिव्ह होते.

फॉर्मल्डिहाइड हे एक रसायन आहे, ज्याचा वापर मृतदेहाचं संरक्षण करण्यासाठी केला जातो. International Agency for Research on Cancer (IARC) ने त्याला मानवी कर्करोगजनक म्हणून वर्गीकृत केलंय. दीर्घकाळ सातत्याने संपर्क आल्यास त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तरीही हे रसायन दररोज वापरल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळतं.

फॉर्मल्डिहाइड का वापरले जाते?

फॉर्मल्डिहाइड हे मानवी आरोग्यासाठी योग्य नसल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीही ते सौंदर्यप्रसाधन उद्योगात वापरण्यात येतंय. याचं कारण म्हणजे ते उत्पादनांचे शेल्फ-लाईफ वाढवतं आणि सूक्ष्मजीवांची वाढ रोखतं. मात्र ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरते.

ग्राहकांना अनेकदा याची कल्पनाही नसते, कारण हे रसायन फॉर्मल्डिहाइड-रिलीजिंग एजंट्सच्या स्वरूपात असतं जसं की DMDM हायडॅन्टॉइन, क्वाटरनियम-15 आणि इमिडाझोलिडिनिल युरिया. हे घटक हळूहळू फॉर्मल्डिहाइड सोडतात आणि लेबलवर स्पष्टपणे नमूद केलेले नसतात.

कृष्णवर्णीय आणि लॅटिन महिलांमध्ये फॉर्मल्डिहाइडचं प्रमाण जास्त असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर अधिक प्रमाणात आढळला. विशेषतः केस सरळ करणारे रिलॅक्सर्स आणि रंग. societal beauty standards मुळे या सवयी तयार झाल्या असून त्यामुळे हार्मोन-संबंधित कॅन्सरचं प्रमाण या गटांमध्ये जास्त असल्याचं दिसतं.

अभ्यासात असं सुचवलं आहे की, फॉर्मल्डिहाइडयुक्त उत्पादनांचा जास्त वापर आणि कृष्णवर्णीय महिलांमध्ये स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाच्या कॅन्सरचं जास्त प्रमाण यामध्ये संबंध असू शकतो.

हेअर स्ट्रेट करणाऱ्या उत्पादनांमध्ये फॉर्मल्डिहाइडचा धोका आधीच्या संशोधनात देखील दर्शवण्यात आला होता. पण या नव्या अभ्यासाने चिंता अधिक वाढवली आहे. कारण त्वचेवर थेट लावल्या जाणाऱ्या आणि दररोज वापरले जाणाऱ्या अनेक प्रोडक्टमध्येही हे रसायन आहे. सततचा संपर्क आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Fire : १५ रुग्णालयांच्या इमारतीत भीषण आग, ५० अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, खिडकी तोडून...

Maharashtra Politics: मोठी बातमी! CM फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा

Black coffee: दररोजची ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी ठरते फायदेशीर…पण एका अटीवर! तज्ज्ञांनी केले मोठे खुलासे

Jaya Bachchan: 'राज्यसभेत इतके ओरडतात की मला ऐकू येण बंद झालं...'; जया बच्चन असं का म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT