घसा खवखवल्याने तो दुखतो, पाणी सुद्धा आपण पिऊ शकत नाही. कधी कधी सर्दी, खोकल्यामुळे घश्यावर खूप परिणाम होतो. त्यात जेवण गिळण्यास त्रास, नाक वाहणे, ताप या समस्या आपल्याला सतत होत असतात. ही लक्षणे अनेक धोकादायक आजारांनाही तुमच्या जवळ बोलवतात. चला जाणून घेऊया घसा खवखवण्याचे कारण काय असू शकते आणि कोणते आजार होण्याची शक्यता असते.
बॅक्टेरियल इन्फेक्शन
घसा खवखवला तर तो आपोआप बरा होत नाही, त्यासाठी काहीतरी उपाय करावे लागतात. अशा परिस्थितीत, हे स्ट्रेप्टोकोकल म्हणजेच स्ट्रेप थ्रोट बॅक्टेरियाचे संक्रमण देखील असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास संधिवाताचा ताप, मूत्रपिंडाची जळजळ आणि पू भरलेला गळू होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांकडून चाचणी करून शोधू शकता आणि त्याचे उपचार त्वरित सुरू होऊ शकतात.
कर्करोग
घसा खवखवण्याची समस्या कायम राहिल्यास ते कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते. हे स्वरयंत्र, घशाची पोकळी किंवा टॉन्सिलपासून सुरू होऊ शकते. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
कधीकधी ऍलर्जीमुळे घसा खवखवणे आणि जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. हे धूळ, माती किंवा अन्न ऍलर्जीमुळे देखील होऊ शकते. या स्थितीत प्रकृती बिघडू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांची मदत घ्या.
कोविड-19
कोविड-19 सारख्या धोकादायक आजारातही घसा दुखतो. त्यामुळे घसादुखीकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या मदतीने ते ओळखले जाऊ शकते आणि त्वरित उपचार सुरू केले जाऊ शकतात. या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे धाव घेणे आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav