Headache Solutions  Saam TV
लाईफस्टाईल

Headache Solutions : डोकेदुखीवर रामबाण उपाय; 5 मिनिटांत मिळेल आराम

Headache Home Remedy : घरी असल्यास टीव्ही किंवा ऑफिसमध्ये लॅपटॉवर काम सुरू राहतं. त्यामुळे डोळ्यांवर ताण वाढतो आणि डोकेदुखी वाढू लागते.

साम टिव्ही ब्युरो

डोकेदुखी ही फार सामान्य समस्या आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र ही सामान्य समस्या नसून फार गंभीर असते. वेळीच उपचार न केल्यास डोकेदुखी जास्त वाढत जाते. त्याने कामात लक्ष लागत नाही. नातेसंबंधात वाद होतात. ताण जास्तप्रमाणात वाढतो.

आपल्या सर्वांची जीवनशैली फार व्यस्त असते. सकाळी उठल्यापासून डोळ्यांसमोर आधी फोन स्क्रीननंतर, घरी असल्यास टीव्ही किंवा ऑफिसमध्ये लॅपटॉवर काम सुरू राहतं. त्यामुळे डोळ्यांवर ताण वाढतो आणि डोकेदुखी वाढू लागते. त्यामुळे आज डोकेदुखीवर काही घरगुती उपचार जाणून घेऊ.

तुळस

तुळस ही आयुर्वेदीक वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या घरामध्ये बाल्कनीत सर्वांकडे असचे. तुम्हाला जास्त डोकेदुखीचा त्रास होत असेल तर लगेचच तुळशीच्या पानांचे सेवन करा. तसेच यातील ३ ते ४ पानं हातावर कुसकरून कपाळावर चोळा. तुळशीच्या पानांच्या गंधाने देखील आपल्याला होणारा त्रास कमी होतो.

गरम पाण्यात लिंबू

लिंबू आपल्या शरीरातील आरोग्यासाठी विविध पद्धतीने फायदेशीर आहे. त्यामुळे डोकं जास्त ठणकत असताना एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यानंतर या पाण्यात लिंबूचा रस मिक्स करा. बऱ्याच वेळी पोटात गॅस झाल्याने डोकेदुखी होत असते. त्यामुळे हे पाणी पिल्यानंतर पोटातील गॅस कमी होईल आणि डोक्यावर आलेला ताण देखील दूर होईल.

आले

आले देखील डोकेदुखीवर काम करते. तुम्ही पाण्यात आल्याचा रस पिऊ शकता. मात्र याची चव अनेकांना नकोशी वाटते. त्यामुळे तुम्ही आल्याचा रस आणि लिंबाचा रस एक एक चमचा पाण्यात टाकून पिऊ शकता. आल्याचे सेवन असेही करता येत नसेल तर कडक आल्याचा चहा प्या.

पुदिना

पुदिनामध्ये मेन्थॉल आणि मेन्थॉल आढळते. त्यामुळे डोकेदुखीवर याचा परिणाम होतो. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर पुदिना रस किंवा पुदिना पाणी प्या. तुम्ही पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून ती नुसती चावून देखील खाऊ शकता.

या काही सिंपल टीप्स आहेत. महिन्यातून कधीतरी तुम्हाला अशाप्रकारे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही या सिंपल टीप्स फॉलो करू शकता. मात्र तुम्हाला होणारा त्रास जास्त असेल. तसेच काही केल्या डोकेदुखीवर आराम मिळत नसेल तर डोळ्यांच्या दवाखान्यात एकदा जाऊन या. चष्मा लागल्याने देखील डोकेदुखी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT