FD Interest Rate Saam Tv
लाईफस्टाईल

HDFC vs ICICI Bank: दिवाळीच्या बोनसमधील पैसे उरलेत? FD मध्ये करा गुंतवणूक मिळेल चांगला परतावा, या बँका देतायत अधिक व्याजदर

FD Interest Rate: दिवाळीच्या मुहूर्तावर एफडीवर चांगले व्याज मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FD Interest Rate Of HDFC Vs ICICI Bank :

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वजण नवीन वस्तू खरेदी करतात. दिवाळीच्या काळात नवीन वस्तू घेणे चांगले असते असे अनेकांचे मत असते. दिवाळीत अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एफडी खूप चांगला पर्याय आहे.

दिवाळीत जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकेचे एफडी दर माहित असणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या काही एफडीबद्दल माहिती देणार आहोत.

जर तुम्ही एचडीएफसी बँकेत २ कोटींपेक्षा कमी एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल तर यावर तुम्हाला 7.75 टक्के व्याज मिळणार आहे. तर आयसीआयसीआय बँकेत जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याजदर मिळणार आहे.

HDFC बँकेचे व्याजदर

  • 7 ते 14 दिवस - सामान्य नागरीकांना 3 टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरीकांना 3.50 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 15 ते 29 दिवस- सामान्य नागरीकांना 3.50 टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना 4 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 30 ते 45 दिवस- सामान्य नागरिकांना 3.50 तर ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के मिळणार आहे.

  • 46 ते 60 दिवस- सामान्य नागरिकांना 4.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 61 ते 89 दिवस- सर्वसामान्यांना 4.50 टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना 5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

  • 90 दिवस ते 6 महिने- सर्वसामान्यांना 4.50 टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना 5 टक्के व्याज मिळणार आहे.

ICICI बँकेचे व्याजदर

  • 7 ते 14 दिवस - सामान्य नागरीकांना 3 टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरीकांना 3.50 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 15 ते 29 दिवस- सर्वसामान्यांना ३ टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना ३.५० टक्के व्याज मिळणार आहे.

  • 30 ते 45 दिवस- सर्वसामान्यांना 3.50 तर ज्येष्ठ नागरीकांना 4 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 46 ते 60 दिवस- सामान्य नागरीकांना 4.25 तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75 व्याज मिळणार आहे.

  • 61 ते 90 दिवस- सर्वसामान्य नागरीकांना 4.50 तर ज्येष्ठ नागरीकांना 5.25 टक्के व्याज मिळणार आहे.

  • 91 ते 120 दिवस- सामान्य नागरीकांना 4.75 टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना 5.25 टक्के व्याज मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT