Instagram Reels : हल्ली बरेच तरुण सोशल मीडियावर आपला वेळ घालवत असतात. त्यातील एक इन्स्टाग्राम. सध्या यावर असणाऱ्या रिल्सचा ट्रेंड जगभरात पाहायला मिळत आहे. यामाध्यमातून अनेकांना पैसे मिळतात तर काही विरंगुळ्यासाठी वापरतात.
अशातच काही युजर्स हे आपल्या मित्र (Friend) किंवा कुटुंबाला (Family) या रील्स शेअर करतात. तसेच, तुम्ही त्यांना बुकमार्क करूनही सेव्ह करू शकता. पण जर हा रिल्स तुम्हाला तुमच्या फोनमध्ये (Phone) डाउनलोड करायचा असेल तर काय करावे हा प्रश्न पडतो.
बरेचदा रिल्स डाउनलोड करण्यासाठी अनेक लोक थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. पंरतु वापरत असलेले अॅप हे कितीही सुरक्षित आहे याबाबत आपल्याला माहीत नसते. ज्यामुळे आपली वैयक्तिक माहीती देखील चोरीला जाऊ शकते. परंतु आम्ही तुम्हाला एक सोपी अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे रिल्स सहजच तुमच्या फोन गॅलरीत किंवा स्टोरीवर सेव्ह करु शकता जाणून घेऊया त्याबद्दल.
1. कसे कराल डाउनलोड ?
सर्व प्रथम तुम्हाला Instagram उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या रील डाउनलोड करायच्या आहेत त्यावर जा.
तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला शेअर आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर एक मेनू उघडेल.
त्यानंतर स्क्रोलचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला Add To Story चा पर्याय मिळेल.
आता ती रिल्स तुम्ही तुमच्या स्टोरीव्हर अपलोड करु शकता.
अपलोड झालेल्या स्टोरीवर क्लिक करुन वरच्या कोपऱ्यातील तीन डॉटवर टॅप करा
यामध्ये तुम्हाला सेव्हचा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा.
त्यानंतर हा रील तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल.
त्यानंतर तुम्ही सेव्ह केलेल्या तुमच्या फोन गॅलरीत जाऊन तुम्ही या रिल्स पाहू शकाल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.