Morning Healthy Drinks Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Healthy Drinks : सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि बिस्कीटचे सेवन ठरू शकते हानिकारक, या हेल्दी ड्रिंकसोबत करा रिप्लेस

Morning Drinks : अनेक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरूवात सकाळच्या चहाने करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Healthy Drinks In Morning Breakfast : अनेक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरूवात सकाळच्या चहाने करतात. चहा आणि बिस्कीट या दोघांचं नातं एका बहीण भावासारखं आहे. एकमेकांशीवाय ते अपूर्ण आहेत. लहानणापासूनची ही सवय आता अनेक व्यक्तींची दिनचर्या बनली आहे.

अशातच अनेक व्यक्ती असे असतात ज्यांना चहा बिस्कीट खायला भरपूर आवडते. परंतू तुम्हाला हे माहीत आहे का की, चहा आणि बिस्कीट या दोघांना सोबत खाल्याने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही सुद्धा तुमच्या दिवसाची सुरुवात चहा आणि बिस्कीट खाऊन करता तर हा लेख तुमच्यासाठी.

चहा आणि बिस्कीटने अशा समस्या उद्भवतात -

एक्स्पर्टचं एकाल तर, ज्या व्यक्ती स्वतःच्या दिवसाची सुरुवात चहा आणि बिस्कीटने करतात त्यांना ऍसिडिटीचा त्रास सहन करावा लागतो. सोबतच पोटवरची चरबी वाढते. एवढंच नाही तर सकाळी चहा आणि बिस्कीट खाल्ल्याने शरीरामध्ये ब्लड शुगर (Sugar) लेवल झपाट्याने वाढू लागते.

यामुळे व्यक्तीला आतड्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सोबतच बिस्कीटमध्ये असलेले गव्हाचे पीठ आणि मैद्याचे पीठ यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंबंधी समस्या वाढू लागतात.

धन्याचे पाणी -

जर तुमचे पोट (Stomach) फुगत असेल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात धन्याच्या पाण्याने करा. हे मिश्रण बनवण्यासाठी एका ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा धन्याची पावडर मिक्स करून प्या. ही ड्रिंक पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर असते. सोबतच पोटफुलणे आणि सुजणे या समस्यांपासून आराम मिळतो.

कोरफडीचा रस -

तुम्हाला कफची समस्या असेल तर, फडीचा रस त्यावर रामबाण उपाय ठरतो. ही ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये पंधरा मिली एवढे एलोवेरा ज्यूस मिसळवा. हे ड्रिंक नैसर्गिक पद्धतीने कार्य करते. जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

हालीमच्या बियांसोबत नारळाचे पाणी -

जर तुमचे सुद्धा केस वारंवार गळत असतील आणि केस गळती तुम्हाला रोखायची असेल तर, दररोज सकाळी तुम्ही हालीमाचा बियांसोबत नारळाची पाणी घ्या. यासाठी नारळाच्या पाण्यामध्ये दोन चमचे हालीम मिक्स करून प्या. या ड्रिंक मध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते जेणेकरून तुमचे केस चांगले राहण्यास मदत मिळते.

दालचिनी आणि नारळ पाणी -

शुगर क्रेविंगला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला दालचिनी आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करायला हवे. हे बनवण्यासाठी नारळाच्या पाण्यामध्ये एक आता चमचा दालचिनी पूड मिक्स करा. हे ड्रिंक शरीरामधील ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते.

बडीशेपचे पाणी -

अन्न व्यवस्थित पचण्यासाठी बडीशेप किंवा बडीशेपच पाणी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. या ड्रिंकच्या सेवनाने तुमची पचनसंस्था सुधारते. एक ग्लास पाण्यामध्ये बडीशोप मिक्स करून किंवा बडीशेपची पावडर मिक्स करून सकाळी पिले तर तुम्हाला अनेक फायदे होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; नाराज मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला|VIDEO

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

छुप्या मार्गे गाईंची तस्करी; आरोपीला विवस्त्र करून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं, नागपूर हादरलं

Cabinet Meeting: ऐन निवडणुकीत फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर...

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

SCROLL FOR NEXT