आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

Sharad Pawar Inspects Polluted Neera River Water: आभाळाएवढ्या दुःखातून सावरत शरद पवार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून बारामतीतील नीरा नदीच्या प्रदूषित पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. गुरुवारी शासकीय इतमामतमध्ये अजितदादांवर अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी बारामतीचे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर नजर जाईल तिथपर्यंत दादांना कार्यकर्ते आणि समान्यांनी गर्दी केली होती आणि अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत होते. ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी पवार कुटुंबावर दुखाचे मोठे आभाळच कोसळले होते. तर शरद पवार यांना माध्यमांशी बोलताना कंठ दाटून आला होता आणि शब्दही फुटत नव्हते.

आज तेच शरद पवार दु:ख बाजूला ठेवून बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे थेट नदीच्या काठी पोहोचले आणि दूषित पाणी का होते आहे याची माहिती घेतली.

नीरा वाघज गावातून जाणारी नीरा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने ग्रामस्थांकडून याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत शरद पवार हे नीरा वाघज येथील नीरा नदी पुलावर काही काळ थांबून परिस्थितीची पाहणी केली. नदीतील दूषित पाणी, त्याचे स्रोत आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती त्यांना प्रत्यक्ष दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com