

मुंबई विमानतळावर कस्टम्स झोन–III कडून 21 ते 29 जानेवारी दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून सुमारे 26.5 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली
निसर्गाच्या अनेक लहरी अनेक वेळी पाहावयास मिळत असतात आणि त्याचे कुतूहल अनेकांना वाटत असते. आज संध्याकाळी सांज फुलत्यावेळी शेकडोंच्या संख्येने सिगल पक्षांची आकाशात घिरट्या घालत जणू काही एक प्रकारे रंगीत तालीम(परेड) केल्याचे दृश्य पहावयास मिळाले, हे दृष्य नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरी येथील आहे. आकाशातील गगनभरारी मारणाऱ्या पक्षांचे मनमोहक दृष्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झालेत.
नंदूरबारच्या धडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला
निगदी फाटा परिसरात आरोपींनी पथकावर केली दगडफेक
महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि महेश लांडगे आमनेसामने आले होते. या सामन्यानंतर आज अखेर सर्व पक्षीय शोक सभेत महेश लांडगे यांनी अजित दादांच्या फोटोसमोर हात जोडत "दादा मला माफ करा " माफी मागितली.
पुण्यातील नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी राहणार बंद
३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी
नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद
अंधेरी पश्चिम परिसरात पूर्णपणे बत्तीगुल झाली आहे.
सुनेत्रा पवारांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. अजित पवारा गटाच्या आमदारांची उद्या ११ वाजता बैठक होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या 1 फेब्रुवारी पासून वाढणार आहे.
जवळपास चार अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्यात
1 फेब्रुवारीपासून या मार्गावरील एकूण फेऱ्यांचा संख्या 1 हजार 410 इतकी होणार
काय केली विकास लवांडे यांनी पोस्ट
मी आज सकाळी बारामतीत अजितदादांच्या प्रथेप्रमाणे राख सावडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आदरणीय शरद पवार साहेबांपासून पवार कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे सर्व सहकारी उपस्थित होते. मात्र अजित दादांच्या पक्षाचा एकही प्रमुख नेता आमदार किंवा मंत्री तिथे उपस्थित नव्हता ते सर्वजण पुढील सत्ता कारण पक्ष आणि मंत्री वगैरे या निवडीच्या गडबडीत होते.मुंबईला त्यांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. कदाचित दादांच्या दशक्रिया होईपर्यंत त्यांना थांबणे शक्य नसावे.
कळवा येथून ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या व ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा..
फलाट क्रमांक एक व दोन मध्ये असणाऱ्या नाल्याच्या मधील कचऱ्याला आग लागल्याने रेल्वेचा खोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती..
- लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आज प्रेस घेतोय, की सुनेत्रा पवारच उत्तराधिकारी असतील
- अचानक दादा सोडून गेले, त्यामुळे आम्ही पोरके झालो
- आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार
- सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी आहोत
- सर्व आमदारांच एकच मत सुनेत्रा वहिनींशिवाय दुसरा नेता असणार नाही
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती...
अहिल्यानगर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी...
यापूर्वीही एकदा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची देण्यात आली होती धमकी...
राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंचा उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा केला आहे
उद्या पवार कुटुंब, आमदारांच्या मतांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे म्हणाले
अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला
काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
तसेच आज त्यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी पवार कुटुंबीय सोनगाव मध्ये दाखल झाले असून, कऱ्हा निरा नदी संगमी अजित पवार यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात येणार आहेत
अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोले यांची गटनेतेपदी निवड
विलास इंगोले हे सलग सात वेळा अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून निवडून आले आहेत
जवळपास सात हजार पेक्षा अधिक मतांनी ते या निवडणुकीमध्ये विजय झाले आहे
अंबड–सिडको परिसरात सोसायटीबाहेर तरसाचे दर्शन
शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजता कम्फर्ट झोन सोसायटीजवळ तरस दिसून आला
सोसायटीचे मुख्य गेट बंद असल्याने मोठा अनर्थ टळला
तरस सोसायटीच्या बाहेरील भागात फिरताना दिसला
पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेता पदावर शिक्कामोर्तब
गणेश बिडकर यांची भाजपच्या गटनेते पदी नियुक्ती
काँग्रेसच्या पुणे महापालिकेतील गटनेते पदी नगरसेवक चंदूशेठ कदम यांची निवड
काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली नियुक्ती
कदम हे विश्वजित कदम यांचे नातेवाईक असून काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहेत
पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे १५ नगरसेवक आले आहेत निवडून
छत्रपती संभाजीनगर शहरात सोनसाखळी चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू झालाय.
महागड्या स्पोर्ट बाईकवरून फिरत चोरट्यांनी दोन ठिकाणी महिलाचे मंगळसूत्र चोरण्याची घटना समोर आली आहे.
केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी थवील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज केला दाखल
तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे नगरसेवक राहुल दामले यांच्या कडून उमेदवारी अर्ज दाखल
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला...
पहिले सव्वा वर्ष शर्मिला पिंपोलकर त्यानंतर दर्शना जानकर महापौर होणार असल्याची माहिती..
भाजपला उप महापौर पदावरच मानावे लागणार समाधान.
ठाणे महानगर पालिकेत शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार आहे.
ठाणे महापालिका उपमहापौर पदाकरीता भाजपकडून कृष्णा पाटील करणार अर्ज दाखल.
शिंदेसेनेच्यावतीने शर्मिला पिंपोळकर हे अर्ज दाखल करणार आहेत.
केडीएमसी महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज सादर
अनुसूचित जमाती आरक्षणामुळे राजकीय समीकरणं बदलली
शिवसेनेकडून हर्षाली थविल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात दाखल
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव घेऊन छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक महापालिकेत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपचा प्रस्ताव
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती
भाजपाची एक हाती सत्ता आली असताना देखील शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला प्रस्ताव
सत्तेत सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास विचार करू दोन्ही पक्षांची भूमिका
केंद्रात आणि राज्यात आम्ही सोबत आहोत, त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील सोबत राहण्यासाठी प्रस्ताव दिल्याची सुनील केदार यांची माहिती
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा केला 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव. भाजपच्या शारदा खेडकर यांना 45 मत मिळाली. त्यात भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिला भाजपला पाठिंबा.
दरम्यान, एमआयएमचे 3 नगरसेवक ऐवेळी राहिले तटस्थ. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा ठरला फोल. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने राखली महापालिकेवरील सत्ता. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सात आणि आठ फेबुवारीला सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राज्य सरकारने काल आदेश काढून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि इलेक्शन ड्यूटी (निवडणूक काम) असणाऱ्या शिक्षकांची अडचण झाली आहे. ते लक्षात घेऊन शासनाने ही परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली. दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे केले असल्यामुळे या परीक्षेत बसणे शिक्षकांना अतिशय आवश्यक आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याने शासनाने या निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीच्या तारखेमध्ये बदल केला आहे. केंद्राच्या सीटीईटी परीक्षेत बसलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे. कोल्हापुरातील परीक्षार्थ्यांना मुंबईचे केंद्र मिळाले आहे. कोल्हापूर अथवा किमान जवळचे केंद्र उपलब्ध करण्याची मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे.
शहादा तालुक्यातील गोदीपूर ते पिंप्री या सुस्थितीत असलेल्या डांबरी रस्त्याची खोदकाम करून वर्ष उलटले, तरी अद्याप काम सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देखभालीचे काम मिळालेल्या ठेकेदाराने जेसीबीने रस्ता उखडून खडी पसरवली आणि काम अर्धवट सोडून तो गायब झाला आहे. रस्त्यावरील उडणारी धूळ आणि पसरलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रस्ता पूर्वीच बरा होता,अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तांत्रिक मंजुरीनुसार तातडीने रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
वाशिम येथील राजस्थान एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय..वर्षातून दोन वेळा या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते असते, गत वेळच्या रक्तदान शिबिरात 300 च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं आणि या वेळेस आयोजकांनी 400 च्या वर या रक्तदाते रक्तदान करणार असल्याची माहिती दिली आहे,त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी रक्तदान कर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं.
स्वर्गीय अजित पवार यांना शिरपूर येथे माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर भारतीय जनतापार्टी तर्फे शोकसभेचे आयोजन करत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे, त्यावेळी अमरीश पटेल यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आपणास देखील खाजगी विमानातून प्रवास करण्यास आता भीती वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे,
अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन....
विविध मगण्यासाठी पडोळे यांनी सुरू केले पाण्याच्या टाकीवर कडून हातात दोराचा फास घेत आंदोलन...
प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय
मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांनी खामगाव नगरपरिषद कार्यालयासमोर 'लोटांगण आंदोलन' करून मुख्याधिकाऱ्यांच्या या कारभाराचा निषेध व्यक्त केला.. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त करत आरिफ पैलवान यांनी हे अनोखे आंदोलन पुकारले..खामगाव शहरात नागरी समस्यांचा डोंगर साचला असताना मुख्याधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत..
यापूर्वी करण्यात आलेल्या विविध आंदोलनांची दखल न घेतल्याने अखेर हे लोटांगण आंदोलन करण्यात आले.. जोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाची आणि मालमत्तेची सखोल चौकशी करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा मोहम्मद आरिफ यांनी प्रशासनाला दिला आहे..
पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील दिवे बंद
पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन कडून अजित दादांना अभिवादन
पुणे जिल्ह्यातील सर्व पंपावर १५ मिनिट दिवे बंद ठेऊन वाहिली श्रद्धांजली
अजितदादा यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल विक्रेत्यांनी संध्याकाळी ७ ते ७.१५ या वेळेत दिवे बंद करून अभिवादन व श्रद्धांजली अर्पण केली
पुणे शहरासह जिल्ह्यातील विक्रेत्यांनी घेतला या मध्ये सहभाग
नागपूर -
- दीक्षाभूमीचा विकास सिंगापूर–दुबईच्या धर्तीवर करण्याची राज्य शासनाची उच्च न्यायालयात माहिती
- आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार, जागतिक पातळीवर निविदा मागविण्याचे मंत्र्यांचे निर्देश
- जिल्हाधिकाऱ्यांची एनआयटीएनएमआरडीए आणि स्मारक समितीसोबत बैठक
- चार पर्यायांपैकी एक आराखडा अंतिम, प्रशासकीय मंजुरी अद्याप प्रलंबित
- यावर मंगळवारी (ता. ३) सविस्तर माहिती सादर करण्याचे न्यायालयाचे मौखिक आदेश
- जनहित याचिका अॅड. शैलेश नारनवरे यांची
नाशिक -
- नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट
- भाजपच्या १६ महिला नगरसेविका महापौर पदासाठी पात्र
- मात्र पहिल्या दिवशी एकाही इच्छुकाने नेला नाही अर्ज
- नाशिक महापालिकेसाठी अंतिमतः ३ महिला नगरसेवकांमध्ये रस्सीखेच
- वरिष्ठ पातळीवरून होणार महापौर पदासाठी चेहऱ्याची निवड
नाशिक -
- नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद
- पीकअप लुटून जीवघेणे हल्ले करत टोळक्याचा रात्रभर धुडगूस
- कुऱ्हाड, कोयते घेऊन ३ ठिकाणी सशस्त्र हल्ले
- अंबडमध्ये वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
- तर गंगापूर रोडवर चहाविक्रेत्यावर हल्ला करत दुकानाची तोडफोड, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- घटनेनंतर पोलिसांकडून एका युवतीसह १० गुंडांना अटक
- टोळीविरोधात खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला, शस्त्रे बाळगणे, संघटित गुन्हेगारी असे १२ पेक्षा जास्त गुन्हे आहेत दाखल
- पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत टोळीचा माफीनामा
नागपूर -
- नागपूर महानगर पालिकेच्या ओबीसी नगरसेवकांवर आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अपात्रतेची टांगती तलवार
- यातच खुल्या प्रवर्गात महापौर पद आल्याने तसव्वा सव्वा वर्षात विभागणी करून पहिली सव्वा वर्ष ओबीसी महिलेला तर दुसरी सव्वा वर्ष खुल्या प्रवर्गातील महिलेला देण्याबाबत भाजप मध्ये चर्चा सुरू
- महापौर पदाच्या निमित्याने भाजप सोशल इंजिनिअरिंग करणार
- या आधी देखील भाजपने नागपूर मनपा मध्ये सव्वा सव्वा वर्षात महापौर पदाची विभागणी केली होती.
- यंदा पण तोच फॉर्म्युला अमलात आणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना महापौर आणि उपमहापौर होण्याची संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न
- नागपूर मनपा मध्ये 151 पैकी 102 जागी युतीचे नगरसेवक निवडून आले आहेत...
कोल्हापूर -
सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करा, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी
सीटीईटी परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने शिक्षकांची कोंडी
परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
कोल्हापुरातील परीक्षार्थ्यांना मुंबईऐवजी जवळचे केंद्र द्यावे – शिक्षक संघटना आक्रमक
नागपूर
- नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
- २०२५ (जाने.–नोव्हें.) कालावधीत २६.८५ लाख प्रवाशांची नोंद
- २०२४ च्या तुलनेत सुमारे १.७३ लाखांनी वाढ
- उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रातील वाढीचा परिणाम
- दररोज सरासरी ९ हजारांहून अधिक प्रवासी ये-जा, सुमारे ६० उड्डाणे (आवागमन) नागपूरहून सुरू
- दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू मार्गांवर सर्वाधिक उड्डाणे, शारजाह आणि दोहा आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध
- नोव्हेंबर महिन्यात २.८ लाखांहून अधिक प्रवासी
नागपूर -
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र
- राष्ट्रवादी दादा गटाच्या कार्यालयात पार पडली श्रद्धांजली सभा
- “मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही”
- नागपूरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची भावना
- राष्ट्रवादी दादा गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, आणि पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र
नागपुर -
- समृद्धी महामार्गावर ‘एचटीएमएस’ प्रणाली बसविण्याचे काम सुरू
- एमएसआरडीसीकडून ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान गँट्री उभारणी
- कामासाठी महामार्ग टप्प्याटप्प्याने तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे...
- प्रत्येक टप्प्यात ४५ ते ६० मिनिटे वाहतूक पूर्णतः थांबवली जाईल
- नागपूर, हिंगणा, वर्धा, सेलू, आर्वी तालुका हद्दीत काम
- एचटीएमएस अंतर्गत ANPR कॅमेरे, वेगमापक, VMS बोर्ड बसविणार
- वाहतूक उल्लंघन नियंत्रण आणि रिअल-टाइम ट्राफिक मॉनिटरिंगसाठी प्रणाली उपयोगी
नागपूर
- नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गट नोंदणी प्रलंबित
- आज गट नोंदणी प्रक्रिया न होणाची शक्यता...
- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी अभ्यास दौऱ्यावर, प्रभार दिलेला नाही.
- आयुक्त आणि जिल्हाधिकारी बाहेर असल्याने प्रक्रिया ठप्प.
- नागपुरात भाजपचा गटनेता अद्याप निश्चित नाही.
- काँग्रेस, मुस्लिम लीग, एमआयएमची नोंदणी पूर्ण.
- चंद्रपूरमध्ये काँग्रेस - भाजपची नोंदणी बाकी.
अहिल्यानगर -
राजकारणाच्या पटलावर अजितदादांचे नाव ठेवायचे असेल तर सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष करून उपमुख्यमंत्री करावे
अहिल्यानगरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र
पक्ष एक संघ ठेवण्यासाठी लाखो कार्यकर्त्यांच्या भावना
सुमित्रा पवारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून विधिमंडळ पक्षप्रमुख करावे अशोक सावंत यांची मागणी
यवतमाळ -
वाळू वाटपाचा दर महिन्याला अहवाल सादर करा
ग्रामपंचायत क्षेत्रातील एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या वाळू घाटातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाला मंजुरी देण्यात आलीये
तसेच वाळू वाटपाचा अहवाल दर महिन्याला सादर करावा असे आदेश यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होणार आहे.
नाशिक -
- शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेते पदी अजय बोरस्ते यांची निवड
- नाशिक महापालिकेच्या गटनेते पदी शिंदेंच्या शिवसेनेकडून अजय बोरस्ते यांची निवड
- नाशिक महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे २६ नगरसेवक
- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधात बसायचे याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती
रत्नागिरी - सततच्या वातावणीय बदलाचा फटका मच्छिमारांना
मच्छिमारांना जाळ्याच मच्छीच सापडेला
पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळी झाली होता स्थलांतरित
तर आता गेले काही दिवस समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने पुन्हा मच्छीमार अडचणीत
मासे मिळत नसलेल्याने मच्छीमारांना सोसावे लागतेय आर्थिक नुकसान
मासेमारी आणि त्यावर अवलंबून असणारे अनेक जोडधंदे देखील संकटाच्या जाळ्यात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.