Sakshi Sunil Jadhav
आजचा दिवस फळदायी ठरेल. नातवंडांकडून आनंदाची बातमी, जोडीदारासोबत मौजमस्ती आणि सासरकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा आणि दुसऱ्यांवर अतिविश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते.
व्यवसायिकांसाठी दिवस आव्हानात्मक आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून मोठी डील फायनल होऊ शकते.
आज मान-सन्मानात वाढ होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आज धनवृद्धीचे योग आहेत. जुना कायदेशीर वाद मिटू शकतो, मात्र वाढते खर्च त्रासदायक ठरू शकतात.
दिवस मिश्र फलदायी राहील. जुने व्यवहार पूर्ण होतील आणि शासकीय योजनांचा लाभ मिळेल.
आज भाग्याची साथ लाभेल. कुटुंबात मंगलकार्य होण्याचे योग असून प्रत्येक कामात यश मिळेल.
आजचा दिवस मिश्र आहे. संतानाच्या आरोग्याची चिंता राहील, मात्र रखडलेली कामे पूर्ण होतील.
आज अध्यात्मिक विचारांकडे कल राहील. नोकरीत पदोन्नतीचे संकेत असून जीवनसाथीकडून सरप्राईज भेट मिळू शकते.
आज जबाबदारीने निर्णय घ्या. व्यवसायात नफा मिळेल, मात्र कोणावरही अंधविश्वास टाळा.
आज महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतील. वाद-विवाद टाळा, अविवाहितांसाठी विवाह प्रस्ताव येऊ शकतात.
आज पद व प्रतिष्ठेत वाढ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, मात्र वचनपूर्तीसाठी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.