Healthy Drinks: पोट साफ होत नाहीये? दिवसाची सुरुवात करा 'या' हेल्दी ड्रिंक्सने !

पोटाच्या समस्या निर्माण होत असतात त्यातील एक म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या.
Healthy Drinks for stomach cleansing
Healthy Drinks for stomach cleansingSaam Tv

Drinks For Constipation : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.आजच्या काळात ही खूप सामान्य गोष्ट झालेली आहे. पोटाच्या समस्या निर्माण होत असतात त्यातील एक म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या.

यामुळे पोट हलके होण्यास त्रास होतो, त्यामुळे तुम्हाला तासनतास टॉयलेट मध्ये बसावे लागते. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यवर आणि मनावरही होत असतो.

Healthy Drinks for stomach cleansing
Constipation : सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? तर शरीरावर होऊ शकतो परिणाम

तुम्ही जर दीर्घकाळापासून बद्धकोष्ठतेच्या त्रस्त असाल तर मुळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा समावेश तुमच्या आहारात केल्याने तुमचे पोट सहज साफ होईल आणि बद्धकोष्ठतेच्या त्रास हळूहळू कमी होईल.

1. लिंबाचा रस

लिंबामध्ये असणारे पोषकतत्व या समस्येपासून मुक्त करू शकतात. लिंबूमध्ये उपलब्ध असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्साइड येथे महत्त्वाचे काम करते. लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स सहज निघून जाते.त्यामूळे सकाळी लिंबू पाणी (Water) प्यायल्याने तुमच्या या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

2. सफरचंदाचा (Apple)रस

पेक्टीन नावाचा घटक सफरचंदामध्ये आढळतो ज्याच्यामुळे पोट जड होते. त्यामुळे मल पास करणे सहज सोपे होते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज नियमितपणे सफरचंदाच्या रसाचे सेवन करू शकता.

Drinks
Drinks canva

3. दूध आणि तूप

आयुर्वेदात दूध आणि तूप फायदेशीर (Benefits) मानले जाते. त्यानुसार दुधात तूप मिसळून प्यायल्याने तुमच्या बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतील. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा तूप टाकून रात्री झोपण्यापूर्वी घेणे गरजेचे आहे यामुळे सकाळी तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते.

4. भाज्यांचे (Vegetable) ज्यूस

आवडत्या भाज्यांपैकी कोणत्याही एका भाजीचा यात तुम्ही वापर करू शकता. दुपारच्या जेवणापूर्वी किंवा संध्याकाळी तुमच्या आवडीच्या भाजीचा एक ग्लास ज्यूस पिणे बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर ठरेल.पालक +टोमॅटो+आले+लिंबू+बीट या सर्व भाज्यांचे एकत्रित मिक्स करून याचा फ्रेश रस तुम्ही पिऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com