Ganesh Chaturthi 2024 saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2024: झाली का गणपतीची तयारी? आताच लिहून ठेवा बाप्पाची स्थापना आणि पुजेची सामग्री!

Ganesh Chaturthi 2024: येत्या शनिवारपासून आपल्यापैकी अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात.

Surabhi Jagdish

हिंदू धर्मामध्ये श्री गणपतीच्या पुजेचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नेहमी सर्व देवतांमध्ये गणेशाची पुजा पहिली केली जाते. आता गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. येत्या शनिवारपासून आपल्यापैकी अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात.

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. पौराणिक मान्यता आणि कथांनुसार या तिथीला गणेशाचा जन्म झाला होता. गणपती बाप्पाची स्थापना करायची म्हणजे नियम देखील पाळले पाहिजेत.

गणेश चतुर्थी केव्हा आहे?

यंदा गणेश चतुर्थी 07 सप्टेंबर 2024 रोजी असून या दिवशी लोक गणपतीची पूजा करतात. अनेकजण घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. 10 दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर गणपतीचं विसर्जन करण्यात येतं. यंदा गणेश विसर्जन 17 सप्टेंबर 2024 रोजी आहे.

गणेश उत्सवाची तयारी कशी कराल?

  • गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापूर्वी किंवा पूजा करण्यापूर्वी घराची नीट स्वच्छता करून घ्या.

  • मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी घराची ईशान्य दिशा उत्तम आहे. या दिशेजवळ गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावं.

  • मूर्तीला एखाद्या उंच ठिकाणी ठेवावं. यासाठी टेबलचा वापर करू शकता.

  • स्टूलवर पसरण्यासाठी स्वच्छ पिवळ्या रंगाचे कापड ठेवा.

  • यावेळी तुम्ही मूर्तीभोवती सजावटही करू शकता. भिंतीवर स्वस्तिक किंवा ओमचा स्टिकर लावणं, रांगोळी काढणं या गोष्टी तुम्ही करू शकता.

गणपती बाप्पाची पुजा करण्यासाठी तुमच्याजवळ योग्य ती सामग्री आहे का याची खात्री करून घ्या. गणपतीच्या पूजेसाठी कोणच्या गोष्टींची आवश्यकता असते, ते पाहूयात.

चौकी, पिवळं आणि लाल कापड, मूर्ती, सुपारी, लाडू, मोदक, दुर्वा, नारळ, फळं, अगरबत्ती, माचिस, सिंदूर, फुलं, कलश, हार, कापूर, हळद, सजावटीचं साहित्य.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT