Fridge Cleaning Tips saam tv
लाईफस्टाईल

Fridge Cleaning Tips: फ्रिजच्या दारातील रबर काळाकुट्ट झालाय? चिंता सोडा, फक्त ही 1 ट्रिक वापरून रबर दिसेल नव्यासारखा चमकदार

Refrigerator door seal: फ्रिजच्या दरवाजाच्या रबरावर काळे डाग आणि बुरशी जमा झाली आहे का? महागडे क्लीनर न वापरता बेकिंग सोडा, डिशवॉश लिक्विड आणि व्हिनेगरच्या मदतीने रबर स्वच्छ करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. रबर खराब होऊ नये यासाठीही घ्या विशेष काळजी.

Surabhi Jayashree Jagdish

फ्रिजचा दरवाजा बंद केल्यानंतर त्यातील थंड हवा बाहेर जाऊ नये यासाठी दरवाजाच्या कडेला रबर लावलेला असतो. या रबरमुळे फ्रिजमधील थंड हवा आतच राहते आणि बाहेरची गरम हवा आत जाण्यापासून रोखली जाते. पण फ्रिजचा सतत वापर आणि ओलाव्यामुळे या रबरावर धूळ, अन्नाचे बारीक कण आणि चिकट घाण जमा होते. काही दिवसांनी या रबरावर काळे डाग दिसू लागतात. अनेकदा त्यावर बुरशीही तयार होते.

तुमच्या फ्रिजच्या रबरावरही काळे डाग पडले असतील तर काळजी करण्याची गरज नाही. यासाठी बाजारातून महागडे क्लीनर आणण्याची आवश्यकता नाही. घरात असलेल्या बेकिंग सोड्याच्या मदतीने तुम्ही फ्रिजचे रबर सहज स्वच्छ करू शकता. पण साफसफाई करताना रबर खराब होणार नाही, याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

फ्रिजचे रबर स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

सर्वात आधी एका भांड्यात साधारण २ कप कोमट पाणी घ्या. त्यात २ मोठे चमचे बेकिंग सोडा टाकून चांगले मिसळा. फ्रिजच्या रबरावर खूप दिवसांपासून घाण साचली असेल किंवा तेलकट डाग असतील तर या पाण्यात डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाकू शकता.

आता मऊ ब्रश असलेला जुना टूथब्रश घ्या. तो तयार केलेल्या मिश्रणात बुडवून फ्रिजच्या दरवाजाला लावलेले रबर हळूहळू घासून स्वच्छ करा. रबराच्या आत असलेल्या छोट्या घड्या आणि कोपरे नीट साफ करा. कारण याच ठिकाणी धूळ, घाण आणि बुरशी जास्त प्रमाणात जमा होते.

ब्रशने साफ करताना तो मध्येच पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे ब्रशवर आलेली घाण पुन्हा रबराला लागणार नाही. रबर जोरात घासण्याची गरज नाही. हलक्या हाताने काही वेळा ब्रश फिरवल्यास साचलेली घाण निघण्यास मदत होते.

शेवटी अशा प्रकारे करा रबराची स्वच्छता

ब्रशने रबर स्वच्छ केल्यानंतर एक स्वच्छ मायक्रोफायबर कापड घ्या. ते कोमट पाण्यात थोडं ओलं करून चांगलं पिळून घ्या. या कापडाने रबरावर राहिलेले बेकिंग सोडा आणि साबणाचे अंश पुसून काढा. यानंतर दुसरे कोरडे मायक्रोफायबर कापड घेऊन संपूर्ण रबर व्यवस्थित पुसून घ्या. रबरावर पाणी किंवा ओलावा राहू देऊ नका. कारण सतत ओलावा राहिल्यास पुन्हा बुरशी आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते.

फ्रिजच्या फ्रीजरच्या दरवाजाला असलेले रबरही याच पद्धतीने स्वच्छ करता येते. तसंच वेगळा फ्रीजर, वाइन कूलर आणि बर्फ तयार करणाऱ्या मशीनच्या रबर सीलची स्वच्छताही अशाच प्रकारे करता येतं.

फ्रिजचा रबर जास्त दिवस स्वच्छ ठेवण्यासाठी काय कराल?

फ्रिजची साफसफाई करताना दरवाजाच्या रबराकडेही लक्ष द्या. आठवड्यातून एकदा कोमट पाणी आणि थोडा बेकिंग सोडा वापरून रबर हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे अन्नाचे डाग आणि इतर घाण जास्त दिवस साचून राहणार नाही. रबर पुसल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करायला विसरू नका. रबराच्या घड्यांमध्ये आणि कोपऱ्यांमध्ये पाणी साचलेले नाही ना हे तपासा.

याशिवाय वेळोवेळी रबराची तपासणी करा. रबर कुठे फाटला नाही ना हे तपासा. रबराचे कोपरे आणि वळण असलेल्या भागांकडे लक्ष द्या. रबर खराब झाले असेल किंवा सैल झाले असेल तर केवळ स्वच्छता करून उपयोग होणार नाही. अशा वेळी रबर बदलणं गरजेचं असतं.

बेकिंग सोड्याशिवाय या गोष्टींचाही करू शकता वापर

फ्रिजचे रबर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याशिवाय घरातील आणखी काही गोष्टींचा वापर करता येतो. बेकिंग सोड्यामुळे हलकी घाण आणि रबराला चिकटलेले अन्नाचे डाग सैल होण्यास मदत होते. तर डिश सोपमुळे रबरावर साचलेला तेलकटपणा दूर करता येतो. रबरावर बुरशी आली असेल तर हायड्रोजन पेरॉक्साइडचाही वापर केला जातो. याचा वापर केल्यानंतर रबर स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घ्या आणि नंतर पूर्णपणे कोरडे करा.

पांढऱ्या व्हिनेगरचाही वापर रबरावरील बुरशी आणि घाण साफ करण्यासाठी करता येतो. यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात एकत्र करा. या मिश्रणाने रबर स्वच्छ करा. पण व्हिनेगर जास्त वेळ रबरावर ठेवू नका. त्यामुळे रबर खराब होऊ शकते. स्वच्छता केल्यानंतर रबर व्यवस्थित पुसून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : पोलीस विभागात खळबळ! कर्मचाऱ्याला ४०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

Maharashtra News Live Update: ऊस दर ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस सुरुवात

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय

घरच्या घरी सिल्क साडी धुवायची कशी?

Ind vs NZ 2nd Test: पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या ५ विकेट्स, ब्लंडेल- फिलिप्सने डाव सावरला, आकाश दीपची भेदक गोलंदाजी!

SCROLL FOR NEXT