आज (9 सप्टेंबर) हरितालिका (Haaritalika Teej) साजरी केली जात आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करतात. अविवाहित मुली (Unmarried Girls) सुद्धा चांगल्या पतीसाठी हे व्रत ठेवतात. पण हे व्रत सोपे नाही, पण तरीही काही महिला काहीही न खातापिता संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र हे व्रत करतात. दुसऱ्या दिवशी स्त्रिया सकाळच्या पूजेनंतरच हे व्रत सोडतात. साधारणपणे उपवास करणे आरोग्यासाठी चांगले असते पण उपवास प्रत्येकासाठी चांगला नसतो. ज्यांना डॉक्टरांनी निर्जला व्रत ठेवण्यास मनाई केली आहे, त्यांनी तर असे व्रत करुच नये.
हे देखील पहा-
कोणत्या लोकांनी निर्जला व्रत करु नये
- गर्भवती महिला
जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्हाला तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचीही काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही काही खाल्ले नाही तर बाळाचा विकास देखील व्यवस्थित होऊ शकणार नाही. गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत जर त्यांनी काहीही न खाता उपवास केला तर त्याचा मातेच्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, रिकाम्या पोटी उपवास करण्याऐवजी डॉक्टर फळांसह उपवास करण्याची शिफारस करतात.
- मायग्रेनचे रुग्ण
जर तुम्हाला मायग्रेन असेल तर रिकाम्या पोटी राहणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मायग्रेनचा त्रास रिकाम्या पोटी वाढतो आणि म्हणूनच डॉक्टर निर्जला उपवास ठेवण्याचा सल्ला देत नाहीत.
- मधुमेह रुग्ण
मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास टाळावा, विशेषत: निर्जला उपवास आणि काहीही न खातापिता उपवास करु नये. बराच वेळ उपाशी राहिल्याने मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी बिघडते. काही लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि त्यांना अशक्तपणा, चक्कर येऊ लागते. त्याचबरोबर काही लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे उपवासादरम्यान रक्तातील साखरेची नियमित तपासणी करत राहा. शक्य असल्यास निर्जलाचे व्रत करण्याऐवजी दूध-रस, फळे वगैरे खाऊन व्रत ठेवा.
- शस्त्रक्रियेनंतर
जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल किंवा कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल तर उपवास करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. उपवास करताना देखील डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या, आपल्या डॉक्टरांशी चर्चा करुनच उपवास करा, कोणतीही औषधे रिकाम्या पोटी घेऊ नका.
- हृदयविकाराचे रुग्ण
हृदयविकाराच्या रुग्णांना रिकाम्या पोटी राहणे चांगले नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
- रुग्ण किंवा जे नुकतेच आजारातून बरे झाले आहेत
जर तुम्ही आजारी असाल किंवा अलीकडेच कोणत्याही आजारातून उठलात तरी तुम्ही उपवास टाळावा, कारण आधीच तुमचे शरीर कमकुवत आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.