Teachers Day Gift Saam Tv
लाईफस्टाईल

Teachers Day 2023: आपल्या लाडक्या शिक्षकांना द्या शिक्षकदिनानिमित्त खास आणि युजफूल गिफ्ट

Happy Teachers Day : शिक्षक दिनानिमित्त शाळेत, कॉलेजमध्ये लहान मुलं शिक्षकांना लहान-लहान गिफ्ट देतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teachers Day Gift Ideas

उद्या संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे. शिक्षकांच्या सन्मानाचा करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक जण या दिवशी शिक्षकांच्या प्रती असलेला आदर, कृतज्ञता वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. अनेक जण शिक्षकांना वेगवेगळी भेटवस्तू देतात.

शिक्षक दिनानिमित्त शाळेत, कॉलेजमध्ये लहान मुलं शिक्षकांना लहान-लहान गिफ्ट देतात. शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पाया पडतात, आशिर्वाद घेतात. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना द्यायच्या काही भेटवस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुस्तके

शिक्षक आणि पुस्तकांचा अतुट संबंध असतो. शिक्षक विद्यार्थांना पुस्तकातून ज्ञान देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना पुस्तके भेटवस्तू म्हणून दिली तर त्यांना नक्कीच आनंद होईल. शिक्षकांना आवड असलेली पुस्तके त्यांना भेटवस्तू म्हणून द्या.

पेन

शिक्षकांसाठी पेन खूप महत्त्वाचा असतो. शिक्षक विद्यार्थ्यांचा हात धरुन पेन आणि पेन्सीलने शिकवतात. त्यामुळे तुम्ही पेन भेटवस्तू म्हणून देऊ शकतात.

ग्रिटींग कार्ड

शिक्षकांना स्वतः च्या हाताने बनवलेले ग्रिटींग कार्ड भेटवस्तू म्हणून द्या. विद्यार्थ्यांने स्वतः च्या हाताने बनवलेले गिफ्ट पाहून शिक्षकांना नक्कीच आनंद होईन. त्या कार्डमधून तुम्ही त्यांना धन्यवाद बोलू शकता. तुमच्या मनातील भावना व्यक्त करु शकता.

डायरी

शिक्षकांना तुम्ही डायरी भेटवस्तू म्हणून देऊ शकता. डायरी ही प्रत्येक शिक्षकाच्या उपयोगाची वस्तू आहे. ज्याचा वापर ते रोजच्या आयुष्यात करतात.

रोपटं

शिक्षक आपल्याला नेहमी झाडांचे महत्त्व सांगतात. त्यांच्यामुळेच आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व समजले. त्यामुळे त्यांना लहान रोपटं भेटवस्तू म्हणून द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT