भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात शिक्षक नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा करतात? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.
विद्यार्थी आणि शिक्षकाचे नात हे खूप घट्ट असते. प्रत्येकाच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा असतो. शिक्षक आपल्याला आयुष्याचे धडे देतात. उद्या संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा केला जाणार आहे.
५ सप्टेंबरला देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक,तत्वज्ञ आणि विद्वान होते. विविध विषयांवर त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांना देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते.
१९६२ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कारभार स्विकारला. यावेळी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी राधाकृष्णन म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. त्यामुळे मला अभिमान वाटेल. त्यांच्या इच्छेनुसार भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्षन यांनी वयाची ४० वर्षे शिक्षक म्हणून काम केले. शिक्षकांचा आदर करावा यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो अशी त्यांची धारणा होती. खरा गुरू कठीण परिस्थितीचा सामना करायला शिकवतो. आयुष्यात मोलाचे योगदान देतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शिक्षकांनी केलेल्या सर्व कामांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक मोठी संधी आहे. म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो.
देशासह जगभरातही अनेक ठिकाणी शिक्षक दिन साजरा केला जोते. १९९४ मध्ये, युनेस्कोने शिक्षकांच्या सन्मानार्थ ५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा केली. रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रिटन, पाकिस्तान, इराण या देशांमध्ये ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.