सध्या धकाधकीच्या जीवनात कामामुळे आपल्याला आपल्याच घरातील व्यक्तींना वेळ देता येत नाही. अनेक मुलं मुली कामानिमित्त आपल्या घरापासून शहरापासून दूर राहतात. त्यामुळे पटकन घरी धावती भेट देखील देता येत नाही. त्यात आता 12 मे जवळ येत आहे. या दिवशी सर्वत्र मदर्स डे साजरा केला जातो.
आता तुम्ही घरापासून दूर असल्याने तुम्हाला तुमच्या आईची या दिवशी जास्त आठवण येणार. तसेच तुमची आई देखील तुम्हाला फार मिस करणार. मात्र आता यामुळे हतबल न होता तुम्ही आईसाठी अताच काही प्लॅनिंग करू शकता.
आईला पत्र लिहा
आजकाल डिजिटलचे युग आहे. कुणाशी संवाद साधायचा असेल तर झटपट फोनवर बोलता येते. व्हिडिओ कॉल करून त्या व्यक्तीला पाहता देखील येते. मात्र या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईसाठी एक पत्र लिहा. पत्र जुन्या पद्धतीचे असेल तरी आपल्या मुलाने लिहिलेलं पत्र पाहून तुमची आई फार खुश होईल.
आईसाठी मराठी चित्रपटाचा शो बुक करा
तुम्ही जरी घरी नसाल तरी तुम्ही तुमच्या आईसाठी एखाद्या मराठी चित्रपटाचा शो बुक करू शकता. मदर्स डेच्या दिवशी तुम्ही आईला फोनवर विष केल्यानंतर तिकीट आणि शो बद्दल सांगा. याने आईचा दिवस छान जाईल. तिला फार आनंद होईल. हा चित्रपट आईच्या कायम स्मरणात राहील.
फोटो फ्रेम पाठवा
तुम्ही आईसाठी तुमच्या बालपणीचे आणि आईच्या बालपणीचे काही फोटो असतील तर ते कोलाज करा. त्याची छान फेम तयार करा आणि ती आईला कुरिअरने पाठवा. हे फोटो पाहून तुमच्या आईच्या डोळ्यात आनंाश्रू तरळरतील.
घरी स्पा बुक करा
तुमची आई एकटी बाहेर जाण्यास तयार नसेल तर तिच्यासाठी एक स्पा घरी बुक करा. स्पामधील व्यक्ती घरी येऊन आईला ट्रीटमेंट देतील. यामध्ये हेअर स्पा, बॉडी मसाजचे पॅकेज घ्या. यासह तुम्ही आईसाठी एखादी सुंदर साडी देखील घरी पाठवू शकता.
या अगदी छोट्या गोष्टीतून तुम्ही घरी नसताना देखील तुमच्या आईला आनंदी ठेवू शकाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.