Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीचे वय झाल्यानंतर केस पांढरे होण्यास सुरुवात होते. केस वयाच्या पन्नाशीनंतर पांढरे होतात. मात्र काही तरुण मुला-मुलींचे केस कमी वयात म्हणजे अगदी २० ते ३० वर्षांचे असतानाच पांढरे होण्यास सुरुवात होते. मात्र असं नेमकं का होतं? याचं ठोस कारण कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यामागचं खरं आणि खास कारण सांगणार आहोत.

केसांचा रंग पांढरा का होतो?

काही तज्ज्ञ असे सांगतात की, केस पांढरे होण्याचं कारण अनुवंशीक असू शकते. तर काहीवेळा हार्मोन्सच्या बदलामुळे देखील केस पांढरे होतात, असं सांगितलं जातं. मात्र खरोखर केस पांढरे होण्यामागचं खरं कारण काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

खरं कारण काय?

केसांमध्ये रोम वर्णक म्हणजेच केसांचा रंग पांढरा करणाऱ्या काही कोशिका असतात. या कोशिका मेलेनिन नावाचं केमिकल बनवतात. त्यामुळेच केसांना काळा रंग मिळतो. जस जसे आपले वय वाढते तसतसे केसांमधील मेलेनिन कमी होत जातं आणि ते कमजोर सुद्धा होतं. त्यामुळे केस हळूहळू पांढरे होतात.

इतकंच नाही तर केसांची वाढ सुद्धा होत नाही. जे केस आहेत ते देखील निर्जीव झाल्यासारखे वाटतात. मेलेनिन कमी झाल्यावर केस सुरुवातील तांबडे होतात त्यानंतर ते हळूहळू राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचे दिसतात.

केस कमी वयात पांढरे का होतात?

जेनेटीक असल्यास कमी वायत केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. यामध्ये तुमच्या पालकांचे कमी वायत केस पांढरे झाले असतील तर तुमचे केस देखील फार कमी वयातच पांढरे होण्यास सुरुवात होते. यासह केस पांढरे होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. काही व्यक्तींना आयुष्यात विविध गोष्टींचा ताण तणाव असतो. त्यामुळे त्यांचे केस पांढरे होतात. यासह व्हिटॅमीन बी १२ ची कमी असणे, न्यूरोफाइब्रोमॅटोसिस सारखे अनुवंशिक आजार, यांमुळे सुद्धा केस पांढरे होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

SCROLL FOR NEXT