Benefits of Hibiscus: जास्वंदाच्या फुलामुळे केसांची होईल झटपट वाढ!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांची चांगली वाढ होते

जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात ज्यामुळे केसांची नैसर्गिकरित्या वाढ होते.

Hair Care for Long Hairs | Canva

जास्वंदाचे फूल

केसांच्या उत्तम वाढीसाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलांपासून हेअर मास्क तयार करू शकता.

Hibiscus for Hairs | Canva

जास्वंदाचे फूल

४-५ जास्वंदाची फुले पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या मदतीने फुलांची छान पेस्ट बनवा.

Hibiscus Flower | Canva

कोरफडीचा गर

कोरफडीचे पान पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मधोमध कापून त्यातील कोरफडीचा गर काढून घ्या.

Aelovera | Canva

सर्व मिश्रण एकत्र करा

आता एका भांड्यामध्ये जास्वंदाच्या फुलांची पेस्ट, कोरफडीचा गर छान एकत्र करून त्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्या.

Hibiscus | Canva

घरगुती हेअर मास्क

आता केस मोकळे सोडून हा जास्वंदाचा हेअर मास्क तुमच्या केसांना हळूहळू सर्वत्र लावा.

Hair Massage | Canva

केस स्वच्छ धुवा

२० ते ३० मिनिटांनंतर आपले केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर शॅम्पू करा.

Hair Care Mask | Canva

केसांचे आरोग्य

केसांची वाढ आणि जाडी वाढवण्यासाठी जास्वंदाचा हा हेअर मास्क नक्की वापरून पाहा.

Hair Care Tips | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Hair Care | Canva

NEXT: रोजच्या आहारात 'रेड राईस'चा समावेश करा; आरोग्याला होतील अनेक फायदे

Red Rice Benefits | Canva