Hair Falls Solution Saam tv
लाईफस्टाईल

Hair Falls Solution : सतत केस गळतात ? टक्कल पडण्याची भीती वाटते? आहारातील या पदार्थांना आजपासून करा गुड बाय...

Unhealthy Food For Hair : लांबसडक काळेभोर केस हल्ली सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. पण केस का गळतात ?

कोमल दामुद्रे

Hair Falls Home Remedies : सतत गळणाऱ्या केसांपासून सध्या प्रत्येक वयोगटातील पिढी त्रस्त आहे. लांबसडक काळेभोर केस हल्ली सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. पण केस का गळतात ? यामागचे कारण अनेकांना माहीत नाही.

खाण्यापिण्याची चुकीची पद्धत व प्रदूषणामुळे हल्ली केस गळतीची समस्या वाढते आहे. काहीचे केस लहान वयातच पांढरे होतात तर केस गळतीच्या समस्याही वाढल्या आहेत. असे का होते यामागचे कारण समोर आले आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे ते पदार्थ, ज्यांच्या सेवनाने आपले केस गळायला लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही टाळावेत.

1. केस गळण्याची कारणे

केसांसाठी (Hair) जंकफूड हे अतिशय हानिकारक असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात घाण साचते तेव्हा आरोग्याच्या (Health) अनेक समस्या वाढतात. त्यामुळे शरीरात सूज येणे, सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे अशा समस्या सुरू होतात.

2. कोणते पदार्थ खाण्यासाठी टाळ्याला हवे ?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केसगळतीची समस्या टाळण्यासाठी शिळे अन्न पदार्थ, जंक फूड (Food) खाणे पूर्णपणे टाळा. यासोबतच थंड पदार्थ, राजमा आणि हरभरा डाळही कमी खावी. एवढेच नाही तर बटाटे आणि कोबी खाल्ल्याने केस गळण्याची समस्याही वाढते.

3. हे बदल करा

केस गळतीची समस्या अधिक सुरु झाली असेल तर तुम्हाला खाण्यापिण्यात बदल करावे लागतील. यासाठी तुम्हाला केसांना तेलाने मालिश करायला हवी. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा. यासोबतच जेवल्यानंतर अर्ध्या तासाने आणि झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. प्रदूषणापासून केसांची निगा राखावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT