How To Prevent White Hair :केस गळतीपासून सुटका हवीये ? पांढऱ्या केसांमुळे वैतागले आहात ? मग, या पदार्थांचे आहारात नियमित सेवन कराच !

Hair Falls Problem : वयाची विशी ओलांडल्यानंतर केस पांढरे होऊ लागतात. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होतो.
How To Prevent White Hair
How To Prevent White HairSaam Tv
Published On

White Hair Home Remedies : केस पांढरे होणे, केस गळणे यांसारख्या समस्यांना बहुतेक तरुण वयातील लोकांमध्ये पाहायला मिळताय. वयाची विशी ओलांडल्यानंतर केस पांढरे होऊ लागतात. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होतो.

लहान वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. यासाठी, जीन्सपासून पर्यावरणातील प्रदूषण या सर्व गोष्टींचा समावेश आहे, परंतु बहुतेक सर्व व्यक्ती स्वतःच यासाठी जबाबदार आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे केस पांढरे होतात पण जर आहारात आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यास पांढऱ्या होणाऱ्या केसांपासून सुटका होऊ शकते कसे ते जाणून घ्या

How To Prevent White Hair
White Hair Solution : एकदा करुन तर पाहा! पांढरे केस होतील काळेभोर-दाट, असा तयार करा शिकाकाईचा शाम्पू...

1. केस पांढरे होण्यापासून कसे रोखता येईल ?

केस (Hair) काळे करण्यासाठी अनेकजण डायचा वापर करतात. यामध्ये असणारे घटक केस काळे तर करतातच पण त्यामुळे केसांना हानी होते. केसात असणारे मेलेनिन कमी होते त्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या वाढते. यासाठी काही तेल (Oil)आहेत, ज्याचा वापर करून मेलेनिन वाढवता येऊ शकते. यासोबतच दररोज सकस आहार घेणे आवश्यक आहे. सिगारेट, दारूचे सेवन बंद केले तर केस पांढरे होणार नाहीत. तसेच तणाव, चिंता (Stress), नैराश्य ही देखील मेलेनिन कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

How To Prevent White Hair
Aishwarya Narkar : वय हा केवळ आकडाच असतो

2. आहारात या पदार्थांचा समावेश करा

आहारामध्ये या गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. असे पदार्थ खावेत ज्यात पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतील. याउलट ज्यामध्ये व्हिटॅमिन बी12 असेल असे पदार्थ खा. आहारात कडधान्य किंवा स्प्राउट्स, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस इत्यादींचा समावेश करावा. तसेच क, ड आणि ई जीवनसत्त्वांचीही गरज असते. यासाठी संत्री, आवळा, पालक, बेरी, स्ट्रॉबेरी, गाजर, टूना फिश, सूर्यफुलाच्या बिया, नाचणी, जवस, भोपळ्याच्या बिया इत्यादींचे सेवन करावे.

3. या गोष्टींनीही केस काळे करू शकता

केस पांढरे झाले असतील तर केमिकल प्रोडक्ट्स ऐवजी नैसर्गिक गोष्टींनी केस काळे करा. यासाठी कढीपत्ता आणि बटर मिल्क वापरू शकता. यासोबतच कोरफडीचे जेल आणि तुपाने केसांना मसाज करा. केस काळे करण्यासाठी कढीपत्ता आणि खोबरेल तेलाचाही वापर करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com