Hair Fall in Summer Saam TV
लाईफस्टाईल

Hair Fall in Summer : उन्हामुळे केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढलंय? मग आजपासूनच 'या' टिप्स फॉलो करा

Hair Fall in Summer : केस सिल्की, जाड आणि घनदाट असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी विविध कॉस्मेटीक्स उन्हाळ्याच्या दिवसांत वापरणे थोडं रिस्की आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रखरखत्या उन्हाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर होतो. काही व्यक्तींना उन्हामुळे त्वचेच्या समस्या होतात. डिहायड्रेशन झाल्याने त्वचेच्या समस्या जास्त जाणवतात. ड्राय स्किनसह स्कॅल्प देखील ड्राय असेल तर आपल्या केसांवर त्याचा थेट परिणाम होतो. केस गळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं.

केस सिल्की, जाड आणि घनदाट असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यासाठी विविध कॉस्मेटीक्स उन्हाळ्याच्या दिवसांत वापरणे थोडं रिस्की आहे. कारण उन्हामुळे आधीच स्कॅल्प ड्राय झालेली असते. त्यामुळे उन्हाळ्यात केस जास्त प्रमाणात गळतात. ते रोखण्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.

आवळा

केस गळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे व्हिटॅमीन सी कमी असणे. व्हिटॅमीन सी कमी असल्यास तुम्ही आवळ्याचे सेवन करावे. आवळा कँडी, आवळा तेस केसांना लावा. यामुळे व्हिटॅमीन सी वाढेल. तसेच स्कॅल्पही कोरडी राहणार नाही आणि केस गळती कमी होईल.

हिरव्या पालेभाज्या

ज्या व्यक्तींना फार जास्त केस गळती होतेय आणि आता थेट टक्कल पडण्याच्या मार्गावर आले असाल तर आजपासूनच हिरव्या पालेभाज्या खाण्यास सुरुवात करा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. पालेभाज्या खाल्ल्याने शरिरातील सर्व पोषकतत्व पूर्ण होतात. केस वाढीसाठी शरिरातील काही जिवनसत्व कमी असतील तर ही कमी याने पूर्ण होते.

मेथीचे दाने

मेथीचे दाने कडू असतात. मात्र तुम्ही ते मुग आणि मटकी सारखे भिजत ठेवून मोड आल्यावर खाऊ शकता. मेथीच्या दान्यांमुळे केसांच्या समस्या दूर होतात. मेथीच्या दान्यांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. यामध्ये डिटॉक्सिफाईड असते त्यामुळे केस आणखी लांब आणि घनदाट होतात.

टीप : केसांबाबत ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या फायद्यांचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT