Priya More
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मेथीचे पाणी पिणे गरजेचे आहे.
मेथी हृदयासाठी चांगली असते. मेथीचे पाणी प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मासिक पाळीत महिलांनी मेथीचे पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी आणि इतर वेदनांपासून आराम मिळतो.
मेथीचे पाणी प्यायाल्यामुळे स्किन अॅलर्जी आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर ठरते. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ते खाल्ल्यामुळे पोट भरलेले वाटते.
अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी मेथीचे पाणी प्यावे. पचनक्रिया देखील सुधारते.
डायबिटिज नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी खूप मदत होते.
मेथीचे पाणी प्यायल्यामुळे केस गळतीची समस्या देखील दूर होते.
अर्धा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उठून उपाशीपोटी प्या.