Hair Dye Kidney Failure Risk Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Dye Kidney Failure Risk: सौंदर्याच्या नादात 20 वर्षीय तरूणीचं आरोग्य धोक्यात, हेअर डायमुळे किडनीवर परिणाम

Hair Dye Kidney Failure Risk Chemical Danger: वारंवार केसांना हेअर डाय लावणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हेअर डायमधील रसायनांमुळे किडनी फेल होण्याचा धोका वाढतोय. तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

Manasvi Choudhary

आजकाल महिला, मुली व पुरूष केसांना कलर करतात. फॅशनच्या दुनियेत केसांना कलर करण्याचा ट्रेंड अनेकजण फॉलो करतात. एवढंच नाही तर वयस्कर व्यक्ती देखील केसांना कलर करतात. केस पांढरे होऊ नये म्हणून केसांना कलर करतात. केसांना कलर केल्याने सौंदर्य अधिकच खुलते. मात्र केसांना डाय केल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हेअर डायरमधील केमिकल्स हे आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे.

चीनमधील एका २० वर्षीय तरूणीला केसांना कलर केल्यामुळे गंभीर त्रास झाला आहे. ही तरूणी वारंवार केसांना कलर करायची. आपले केस सेलिब्रिटीसारखे दिसावेत यासाठी ती नेहमी पार्लरमध्ये जायची केसांना कलर करायची. मात्र काही महिन्यांनी अचानक या मुलीच्या पायावर लाल चटा येऊ लागल्या, पोटात आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या यामुळे तिला हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला किडनीशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले.

हेअर डायरमुळे किडनीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हेअर डायरसाठी वापरण्यात जाणाऱ्या केमिकल्समुळे हा धोका वाढला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवारं केसांना कलर केल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात ज्यामुळे फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांना त्रास होते यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

  • हेअर डायमध्ये सॉल्व्हेंट हे रंगहीन द्रव असते.

  • जेव्हा हे रसायन शरीरात प्रवेश करते तेव्हा शरीरातील द्रवपदार्थ अधिक दाट होतात.

  • यामुळे किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.

  • प्रोपिलीन ग्लायकॉलमुळे किडनीच्या शिरांना सूज येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT