Hair Growth Oil  Saam TV
लाईफस्टाईल

Hair Growth Oil : खोबरेल तेलात या भाज्या अ‍ॅड करा; केस लांबसडक आणि चमकदार होतील

Hair Care Tips : केसांची मुळे कमकुवत होतात. त्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते. तसेच जे केस आहे ते देखील पांढरे होऊ लागतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांच्या समस्या अद्यापही पूर्णतः मिटलेल्या नाहीत. अनेक महिला आणि पुरुष केस गळती थांबवण्यासाठी तसेच सुंदर केसांसाठी विविध प्रयोग करत असतात. मात्र तरी देखील केस गळणे, केस पांढरे होणे, ड्राय हेअर या समस्या कायम आहेत. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय शोधला आहे. यामध्ये तुम्हाला घरातील काही भाज्यांचा वापर करून तेल बनवायचे आहे.

रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ खात नाही. यातील काही पदार्थ आपल्या केसांसाठी फार महत्त्वाचे असतात. मात्र जेवणातून आपण ते वळतो. त्यामुळे केसांना हवे असलेले प्रोटीन मिळत नाही. केसांची मुळे कमकुवत होतात. त्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते. तसेच जे केस आहे ते देखील पांढरे होऊ लागतात. त्यामुळे आज या बातमीमधून आपण खोबरेल तेलात कोणत्या भाज्या मिक्स केल्यावर परफेक्ट आणि रामबाण तेल बनते याची माहिती जाणून घेणार आहोत.

साहित्य

नारळाचे तेल - 500 ग्रॅम

कढीपत्त्याची पाने - 2 वाटी

कांदा - 3

अद्रक - 1 वाटी किसलेले

कोरफड - 50 ग्रॅम

कलोंजी - 50 ग्रॅम

मेथीदाणे - 50 ग्रॅम

कृती

तेल बनवण्यासाठी सर्वात आधी एक लोखंडी कढई घ्या. ही कढई गॅसवर ठेवा आणि थोडी गरम होऊ द्या. कढई तापल्यावर त्यामध्ये नारळाचे तेल टाका. नारळाचे तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाका. तसेच नंतर कांदा टाकून घ्या. कांदा थोडा लाल होऊ द्या. त्यानंतर या तेलामध्ये अद्रक, कलोंजी आणि मेथी दाणे देखील मिक्स करा. हे सर्व साहित्य तेलामध्ये छान भाजून घ्या. तेलाला एक उकळी आली की साहित्या थोडे काळपट दिसू लागेल. त्यानंतर गॅस बंद करा.

तसेच तेल थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने तेल गाळून घ्या. तेलामध्ये असलेले सर्व पदार्थ निघून जातील. तसेच यातील पोषक तत्व तेलामध्ये उतरेल. पुढे एका सुती कापडामध्ये देखील तेल गाळून घ्या. कारण केसांना लावताना त्यामध्ये पदार्थ आल्यास केसांचा वास येऊ शकतो. संपूर्ण तेल छान गाळून झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावले पाहिजे. तेल लावल्यानंतर दोन तासांनी केस धुवून टाका.

हे तेल रात्रभर केसांमध्ये लावून सकाळी केस धुवावेत असे करू नका. अशा पद्धतीचे तेल रात्रभर केसांमध्ये ठेवल्याने केसांमधील कोंडा आणखी वाढतो. त्यामुळे तेल लावण्याआधीही काळजी नक्की घ्या. या काही सिंपल टिप्स फॉलो केल्याने केसांसंबंधी तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT