Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips: केसांना तेल लावताना तुम्हीही या चूका करताय? आताच थांबा, अन्यथा केस जास्त प्रमाणात गळतील

Hair Care: अनेक महिला तसेच पुरुष देखील केसांना तेल लावताना बऱ्याच चुका करतात. त्याने केसांवर उलट परिणाम होतो. तेल केसांच्या पोषणासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच घातक देखील आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Oil On Hair:

केसांना तेल लावल्याने केसांची चांगली वाढ होते, असं लहानपणापासून तुम्ही ऐकलं असेल. मात्र केसांना तेल लावताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लांब आणि काळे भोर केस हवे असतील तर केसांना तेल लावण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक महिला तसेच पुरुष देखील केसांना तेल लावताना बऱ्याच चुका करतात. त्याने केसांवर उलट परिणाम होतो. तेल केसांच्या पोषणासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच घातक देखील आहे. त्यामुळे आज या बातमीतून केसांना कोणत्यावेळी तेल लावू नये याबाबत जाणून घेऊ.

अॅक्ने

केसांमध्ये म्हणजे तुमच्या माथ्यावर जर अॅक्ने म्हणजेच लाल रंगाचे फोड आले असतील तर सावधान. अशावेळी केसांना तेल लावू नका. जर केसांमध्ये अॅक्ने असताना तुम्ही तेल लावले तर तिथे जखम तयार होते. तसेच केसांत जास्त खाज येते. केसांत अॅक्ने होऊनये यासाठी योग्या तो वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कोंडा

अनेक तरुणांमध्ये केसांत कोंडा असल्याच्या समस्या आहेत. केसांत कोंडा असल्याने सतत खाज येते. त्यामुळे अनेक जण डोकं थंड राहण्यासाठी भरमसाठ तेल लावतात. मात्र अशावेळी केसांना तेल लावल्यास कोंडा आणखी वाढू शकतो.

तेलकट त्वचा

तुमच्या केसांची त्वचा म्हणजे स्काल्प ऑइली असेल तर बाहेर पडताना शक्यतो तेल लावणे टाळा. त्याने केस आणखी खराब होऊ शकतात. तसेच केस गळतीही वाढू शकते.

ओले केस

केस धुतल्यानंतर ते पूर्ण वाळू द्या. अनेक महिला लांब केस असल्यास केस पूर्ण सुकलेले नसतानाच वरती बांधून ठेवतात. त्यानंतर ओल्या केसांमध्येच तेल लावतात. असे केल्याने केस विरळ होतता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

SCROLL FOR NEXT