Diwali 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Diwali 2024 : दिवाळीत घराची साफसफाई करताना केस खराब होणार नाही; फक्त या टिप्स फॉलो करा

Hair Care Tips :दिवाळीसाठी घराची साफसफाई करताना केस खराब होतात. त्यामुळे यावर आम्ही काही उपाय शोधला आहे. त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दिवाळी आता पुढच्या महिन्यात सुरू होत आहे. दिवळी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सण. मुलांना सुद्धा दिवाळीसाठी शाळेला मोठी सुट्टी मिळते. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी लाडू, करंजी विविध मिठाई आणि बरंच काही असतं. दिवाळी सुरू होण्याआधी प्रत्येक व्यक्ती आपल्या घराची साफसफाई करतात. घराची साफसफाई करताना बरीच मेहनत लागते. शिवाय धूळ असल्याने केसही खराब होतात.

केस खराब होण्याच्या समस्या आधीच जास्त आहेत. त्यात दिवाळीत केसांवर धूळ उडल्याने केस आणखी जास्त ऋक्ष होतात. त्यामुळे आज दिवाळीत साफसफाई करताना केसांची काळजी कशी घ्यायची याची माहिती जाणून घेणार आहोत.

साफसफाई करण्याआधी केस धुवू नका

साफसफाई करण्याआधी कधीच हेअर वॉश करू नका. त्यामुळे केस ओले राहतात. केस ओले असल्यावर त्यावर धूळ लगेचच चिकटते. त्यामुळे केस धुवत असताना तुम्हाला ही काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा याने केस आणखी जास्त खराब होतात. कारण ओल्या केसांना धूळ जास्त वेळ चिकटून राहते. त्यामुळे जरी तुम्ही सकाळी अंघोळ केली असेल तरी देखील साफसफाई करायची असल्यास केस ओले करू नका.

केसांना तेल लावू नका

बऱ्याच व्यक्तींना रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपण्याची सवय असते. मात्र जर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच साफसफाई करणार असाल तर केसांना तेल लावू नका. कारण केसांना तेल लावल्याने त्याने केसांवर धूळ जास्त ओढली जाते. धुळीचे बारीक कण केसांवर चिकटतात. केसांवर धूळ चिकटल्याने त्यात केसांना तेल असल्याने त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होतो. स्कॅल्प खराब होते. तर काहींना स्कॅल्पला जास्त खाज येणे आणि केसांत जास्त कोंडा होण्याच्या समस्या उद्भवतात.

केस मोकळे ठेवू नका

साफसफाई करताना केस कधीच मोकळे ठेवू नका. केस मोकळे ठेवल्याने केसांवर आणखी जास्त धूळ बसते. साफसफाई करताना केस मोकळे ठेवण्याची चूक अजिबात करू नका. त्याने केसांमधील प्रोटिन सुद्धा कमी होते. केस तुटता आणि सफेद देखील होऊ लागतात. त्यामुळे साफसफाई करताना एकतर केस वरती बांधून ठेवा किंवा मग त्यांची वेणी बांधा.

हेअर कॅप

केसांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही साफसफाई करताना हेअर कॅप नक्की वापरावी. त्यामुळे काही झाले तरी केसांमध्ये धूळ जात नाही. याने तुम्ही आरामात फॅन, कपाट अशा सर्व वस्तूंवरील धूळ साफ करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार गटाला सर्वात मोठं खिंडार, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; कारण काय?

SCROLL FOR NEXT