बदलत्या ऋतूनुसार केस गळण्याच्या समस्या होत असतात. काहीवेळा आपण विविध ठिकाणी फिरतो तेव्हा तेथील पाणी केस धुण्यासाठी वापरल्याने देखील त्याचा आपल्या केसांवर वेगळा परिणाम होतो. बहुतेक मुलींचे केस अगदी पातळ होतात आणि हेअरफॉल अती प्रमाणात वाढतो. तुमच्याबरोबर देखील अचानक असे घडले तर लगेचच यावर योग्य तो उपचार घेणे फार महत्वाचे असते.
केस तुटूनयेत दाट असावेत यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही धडपड करत असतो. महिला केसांवर बरेच प्रोडक्ट अप्लाय करतात. काही महिला केसांवर आर्युर्वेदीक उपचार सुद्धा घेतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून ही समस्या आहे तशीच कायम असेल तर तुम्ही करत असलेला उपचार थांबवा आणि आज आम्ही जो रामबाण उपाय सांगत आहोत तो ट्राय करा.
मेथी दाणे - २ वाटी
पाणी - १ वाटी
खोबरेल तेल - १ चमचा
जास्वंदाची - ४ फुले
सर्वात आधी एका वाटीत मेथी दाणे घ्या. मेथी दाणे पाण्यात छान भिजवून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मेथी दाणे पाण्यात भिजण्यासाठी ठेवू शकता. त्यानंतर सकाळी मेथी दाणे मिक्सरला बारीक करून घ्या. याची छान पेस्ट करून एका वाटीत ती काढून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये थोडं खोबरेल तेल मिक्स करा. तसेच नंतर जास्वंदाची फुले घ्या.
तुम्हाला येथे जास्वंदाची सुकलेली, वाळलेली फुले घ्यायची आहे. या फुलांची देखील मिक्सरला बारीक पावडर बनवून घ्या. या पावडरमध्ये तयार पेस्ट मिक्स करा. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. अशा पद्धतीने तयार झाला हर्बल हेअरपॅक. हा हेअरपॅक तुम्ही केसांवर लावू शकता. केसांवर लावल्यानंतर तो पूर्णता वाळू द्या. तुम्ही मेहंदी प्रमाणे देखील केसांवर हा हेअरपॅक लावू शकता.
अशा पद्धतीने हेअर पॅक लावल्यानंतर केसांवर हे ४० ते ४५ मिनिटे वाळू द्या. मिश्रण केसांवर पूर्ण सुकल्यानंतर केस धुवून घ्या. हेअरवॉश करताना यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. केस अगदी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कारण केसांची मुळे नाजूक झालेली असतात. त्यावर तुम्ही अगदी गरम पाणी ओतल्याने मुळं आणखी कमजोर होण्याची शक्यता असते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.