Hair Care Tips
Hair Care Tips  Instagram/ @anushkasharma
लाईफस्टाईल

Hair Care Tips : प्रसुतीनंतर केस गळती होतेय? अनुष्का शर्मासोबतही असेच काहीसे घडले

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : हल्ली बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या हेअर स्टाईलमुळे अधिक चर्चेत असतात. नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माची नवीन हेअरस्टाईल चाहत्यांना खूप आवडते. अनुष्का शर्माने केलेल्या हेअर कटने तिचा लूक आणखीनच चमकत आहे.

पण अनुष्का शर्माला नाईलाजाने हे केस कापावे लागले होते. कदाचित अनुष्का शर्माच्या चाहत्यांनाही माहित नसेल की प्रसूतीनंतर तिचे केस गळायला लागले होते. याची माहिती तिने अनुष्काने सोशल मीडियावर दिली होती. प्रसुतीनंतर अनेक महिलांचे केस गळू लागतात ही समस्या सामान्य जरी वाटत असली तरी ती गंभीर रुपात नंतर वळण घेते. जर वेळीच याची काळजी (Care) घेतली तर अनेकांची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

गर्भधारणेदरम्यान केस का गळतात?

गरोदरपणात महिलांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी सामान्य होते, ज्यामुळे त्यांना केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याच वेळी, प्रसूतीच्या 3 ते 6 महिन्यांनंतरही अनेक महिलांना केस (Hair) गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा.

1. दहीचा वापर

तुम्ही केसांमध्ये दही वापरा. दही केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते. केसांमध्ये दही लावल्याने केस मजबूत होतात. यासोबतच नवीन केसही येतात. तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा दह्याने केसांचे कंडिशनिंग करू शकता

2. एवोकॅडो हेअर मास्क लावा

केस गळतीची समस्या असल्यास एवोकॅडो हेअर मास्क वापरून पहा. यासाठी तुम्ही पिकवलेला एवोकॅडो घ्या. ते मॅश करा आणि त्यात एक चमचा नारळाचे दूध घाला. केसांना लावा आणि कोरडे होऊ द्या. यानंतर तुम्ही हलक्या शाम्पूने केस धुवा. एवोकॅडोमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात, जे कोलेजन तयार करण्यास मदत करतात.

3. सकस आहाराची काळजी घ्या

बर्‍याचदा केस गळतात तेव्हाच जेव्हा आपण सकस आहार घेत नाही किंवा आपले खाण्याचे वेळापत्रक बिघडते. म्हणूनच गर्भधारणेदरम्यान आणि नंतर सकस आणि पौष्टिक आहार घ्या. यामुळे केस गळणे टाळता येते. तसेच, भरपूर पाणी आणि द्रव प्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' ज्यूसचे करा सेवन, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

Special Report: अल्टिमेटम संपला तरी Vishal Patil ठाम! सांगलीत पाटलांवर कारवाई होणार?

ICC T20 World Cup 2024: विराट,सूर्या नव्हे तर हार्दिक ठरेल मॅचविनर! माजी भारतीय खेळाडूचा दावा

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री करतो असं उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट

Vishal Patil vs Jayant Patil: उमेदवारीचा किस्सा, आरोप, प्रत्यारोप आणि जयंत पाटील यांचं मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT