Hair Mask, Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Mask : केस विंचरताना तुटतात? रुक्ष झालेत? हा हेअर मास्क ट्राय करा, केस होतील दाट-मजबूत

कोमल दामुद्रे

Methi Curd Hair Mask :

उन्हाळ्यात वातावरणाचा आपल्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामुळे जितकी आरोग्याची काळजी घ्यावी लागते तितकीच केसांचीही. बदलत्या जीवनशैली (Lifestyle) आणि प्रदुषणाचा आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो.

केसगळती, केसात कोंडा होणे, केसांची वाढ खुटणे, केस रुक्ष होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले नाही तर त्याचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही तुमच्या कोरड्या, निर्जीव आणि गळणाऱ्या केसांमुळे वैतागले असाल तर हा हेअर मास्क ट्राय करा.

केस (Hair) मजबूत बनवण्यासाठी आपण दही आणि मेथीचा हेअर मास्क ट्राय करु शकतो. मेथीमध्ये लिनोलिक अॅसिड, निकोटीनिक अॅसिड, ओलेइक अॅसिड, फायबर, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन (Vitamins) सी, झिंक आणि आयर्न आढळते. अनेक पोषक तत्वांनी युक्त मेथी आणि दह्यापासून बनवलेला हेअर मास्क केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

हा हेअर मास्क केसांना हायड्रेट ठेवतो. तसेच केसातील कोंडा दूर करण्यास मदतही करतो. हा हेअर मास्क कसा बनवायचा जाणून घेऊया.

1. मेथीचा हेअर मास्क

दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करुन अर्ध्या वाटीत दह्यात मिसळा. हा हेअर मास्क केसांच्या मुळापासून ते टोकांपर्यंत लावा. अर्ध्या तासानंतर धुवा. केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल.

2. दही-मेथी हेअर मास्कचे फायदे

1. केसांना चमक येते

मेथी दाणे आणि दह्यापासून बनवलेला हा हेअर मास्क केसांची चमक वाढवतो. त्यासाठी हा हेअर मास्क ट्राय करा

2. कोंडा

दही डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करते. यापासून बनवलेला मास्क केसांना मुळांपासून मजबूत ठेवण्यासाठीच नाही तर टाळूवर जमा झालेला कोंडा देखील दूर करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT