Hair Oil : केसांना मुळापासून बनवेल स्ट्राँग, नियमित करा या तेलाचा वापर; केस होतील लांब-घनदाट

Hair Oils For Strong And Shiny Hair : केसांना मुळापासून टोकापर्यंत संपूर्ण पोषण मिळवण्यासाठी त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतात तसेच त्यांची चमकही कायम राहते. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले तर केस पांढरे होत नाही.
Hair Oils For Strong And Shiny Hair
Hair Oils For Strong And Shiny HairSaam Tv

Hair Care Tips :

केसगळती, केस तुटणे, केसांची वाढ खुंटणे आणि केसात कोंडा होणे यांसारख्या समस्यांपासून तरुण वर्ग त्रस्त आहे. अगदी कमी वयात त्यांना टक्कल पडण्याची भीती जाणवू लागलीये.

केसांना (Hair) मुळापासून टोकापर्यंत संपूर्ण पोषण मिळवण्यासाठी त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतात तसेच त्यांची चमकही कायम राहते. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले तर केस पांढरे होत नाही.

केसांना योग्यप्रकारे मसाज केल्याने त्यांची योग्य प्रमाणात वाढ होते. वाढते प्रदूषण, ताणतणाव (Stress) किंवा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस पांढरे होणे, कोरडे आणि कोंडा होण्याच्या समस्यांना समोरे जावे लागते. जर तुम्हाला लांबसडक आणि घनदाट केस हवे असतील तर हे तेल केसांना लावा.

Hair Oils For Strong And Shiny Hair
Hair Growth Smoothie : सततच्या केस गळतीमुळे वैतागले आहात? बायोटिन स्मूदी ठरेल फायदेशीर

1. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल केसांसाठी अतिशय फायदेशीर (Benefits) मानले जाते. हे केसांच्या वाढीसोबतच त्याचे नुकसानही नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि ओलेइक अॅसिड आढळते. ज्यामुळे केसांना आतून पोषण मिळते. तसेच ते मजबूत राहतात. त्यामुळे या तेलाने केसांना मालिश केल्यास फायदा होईल.

2. जोजोबा तेल

जर केस लांबसडक हवे असतील तर आठवड्यातून किमान दोन दिवस जोजोबा तेलाने मसाज करा. यामध्ये हायपो अॅलर्जेनिक असून केसांना मजबूत बनवण्यास मदत करते. या तेलाने मसाज केल्यास कोंडा देखील होत नाही.

3. अर्गन ऑइल

अर्गन ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फॅटी ऍसिडस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आहे. यामध्ये केसांना अंतर्गत पोषण देण्यासोबतच त्यांना जाड ठेवण्यास मदत करते. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून केसांचे संरक्षण करते.

Hair Oils For Strong And Shiny Hair
Herbs For Hair : कोरड्या-रखरखीत केसांमुळे वैतागले आहात? हे ४ आयुर्वेदिक पदार्थ ठरतील फायदेशीर

4. अॅव्होकॅडो तेल

अॅव्होकॅडो तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आहे. या तेलाचा वापर केसांना खोलपर्यंत पोषण देते. तसेच त्यांना लांब आणि चमकदार बनवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com