तुम्ही केसांना दही लावता का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care: तुम्ही केसांना दही लावता का? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Hair Tips: केस निरोगी आणि मऊ राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. काही लोक केसांना दही लावतात. पण ते वापरल्याने कधीकधी केसांना नुकसानही होऊ शकते. तर त्याचे फायदे देखील आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हल्ली प्रत्येक स्त्रीला आपली केस खूप प्रिय आहेत. स्त्रीला तिचे केस काळेभोर, निरोगी आणि घनदाट हवे असतात. परंतु बदललेली जीवनशैली, प्रदूषण आणि धूळ यांचा परिणाम आपल्या केसांवर होतो. त्यामुळे अनेकांना केस गळणे, केस कुरळे होणे या समस्यांना सामोरे जावे लागते. ते रोखण्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन तसेच काही नैसर्गिक घरगुती उपाय करतात.

केस निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय केले जातात त्यात दह्याचा देखील समावेश असतो. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि पोषक घटक असतात, जे केसांना निरोगी ठेवण्याचे काम करतात. अशात अनेक लोक केसांना विविध प्रकारे दही लावतात. अनेक लोक दह्याचा हेअर मास्क बनवून तो केसांना लावतात. दह्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे केसांना मऊ आणि निरोगी ठेवण्याचे काम करतात. केसांना दही लावल्याने त्याचे फायदे तर काही तोटे देखील आहेत. ते आपण जाणून घेऊयात.

केसांना दही लावण्याचे फायदे

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक अॅसिड असते, जे केस मऊ आणि चमकदार बनवतात. हे केसांचा खडबडीतपणा कमी करते. दह्यातील प्रथिने केस मजबूत आणि लांब वाढण्यास मदत करतात. हे केसांच्या मुळांना पोषण देऊन केस निरोगी ठेवते. दह्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळूचे संक्रमण आणि खाज कमी करतात. हे टाळू स्वच्छ ठेवते आणि केस गळती कमी करते. दही केसांना हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणा दूर करते. टाळूवरील अतिरिक्त तेल कमी करण्यात दही उपयोगी ठरते. लॅक्टिक अॅसिड डोक्यातील कोंडा कमी करण्यात मदत करते. नियमित वापर केल्यास दही नैसर्गिक केस मास्कसारखे काम करते.

केसांना दही लावण्याचे तोटे

तेलकट केसांवर दही लावल्यास ते अधिक तेलकट होऊ शकतात. खूप तेलामुळे टाळूवरील समस्या वाढू शकतात. काही लोकांना दह्याची ऍलर्जी असू शकते. यामुळे टाळूवर खाज, जळजळ किंवा लालसरपणा होऊ शकतो. त्यामुळे दही वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. पॅच टेस्ट केल्याने ऍलर्जीक प्रतिक्रिया ओळखता येतात. पहिल्यांदाच दही वापरत असल्यास विशेष काळजी घ्या. दह्याचा खूप वापर केल्यास केस कमजोर होऊ शकतात. दही वापरताना प्रमाण आणि वेळ यांची योग्य निगा राखा.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धनंजय मुंडे काय स्टारपणा दाखवेल? आमच्याकडे त्यांना 'नो एंट्री', राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

SCROLL FOR NEXT