Guru Purnima Shubh Muhurt 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Guru Purnima Shubh Muhurt 2023 : गुरुब्रह्मा, गुरुर्विष्णु...; यंदा गुरु पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

कोमल दामुद्रे

Guru Purnima In Marathi : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा ही ३ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे.

आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आशीर्वादासोबतच धन, सुख व शांती याचे वरदान आपल्याला मिळू शकते. या देवशी व्यासमूनीचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते.

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व (Importance) सांगण्यात आले आहे. गुरूचे स्थान हे जीवनात श्रेष्ठ मानले जाते. गुरू हा देवापेक्षाही मोठा असतो. कारण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवणारा गुरुच असतो. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग (Yog) होत आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग. 

1. गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त (Guru Purnima 2023 Shubh Muhurt )

  • सुरुवात - २ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजून २२ मिनीटांपासून ते

  • समाप्ती - ३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजून ९ मिनीटांपर्यंत 

2. गुरु पौर्णिमा 2023 महत्व (Guru Purnima 2023 Importance )

महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. हिंदू धर्मात महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय 18 पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते.

3. गुरुपौर्णिमा शुभ योग ( Guru Purnima 2023 Shubh Yog )

यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे. ब्रह्मयोग 02 जुलै रोजी संध्याकाळी 07.26 ते 03 जुलै दुपारी 03.45 मिनिटांनी असेल. इंद्र योग 03 जुलै रोजी दुपारी 03:45 वाजता सुरू होईल आणि 04 जुलै रोजी सकाळी 11:50 वाजता समाप्त होईल.

4. गुरु पौर्णिमा पूजन पद्धत (Guru Purnima 2023 Puja )

या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

यानंतर पूजेचे व्रत घ्या आणि स्वच्छ ठिकाणी पांढरे वस्त्र पसरून व्यासपीठ ठेवा.

यानंतर त्यावर गुरु व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यांना कुंकू, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा.

गुरु व्यासांसोबतच शुक्रदेव आणि शंकराचार्य इत्यादी गुरुंना बोलावून "गुरुपरंपरसिद्धयर्थं व्यासपूजन करिष्ये" या मंत्राचा जप करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT