Guru Purnima 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Guru Purnima 2024: 'या' कालावधीत करा गुरुंची पुजा; गुरूपैर्णिमेचा शुभ मुहूर्त काय? वाचा सविस्तर

Guru Purnima 2024 Auspicious Time : गुरुने आजवर आपल्याला वाढवले आणि घडवले. आपल्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, या भावनेने त्यांच्या प्रति असलेल्या सर्व भावना या दिवशी व्यक्ती व्यक्त करतात.

Ruchika Jadhav

आषाढ महिन्यात जून ते जुलै महिन्या दरम्यान गुरुपैर्णिमा येते. या वर्षी २१ जुलै रोजी गुरुपैर्णमा आली आहे. हिंदू धर्मासह जैन धर्मात देखील गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. भारतासह अन्य देशांत म्हणजे नेपाळ आणि भूतानमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो.

गुरुपैर्णिमानिमित्त प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात असलेल्या गुरुंची पुजा करतात. अनेक व्यक्ती देवांची आणि महंत तसेच थोर विचार असलेले संत आणि महापुरुष यांची देखील पुजा करतात. गुरुने आजवर आपल्याला वाढवले आणि घडवले. आपल्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, या भावनेने त्यांच्या प्रति असलेल्या सर्व भावना या दिवशी व्यक्ती व्यक्त करतात.

व्यास पौर्णिमा

गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. ऋषी वेद व्यास यांच्या वाढदिवसाचे स्मरण देखील याच दिवशी केले जाते. गुरुपौर्णिमेला गुरुंची पुजा केली जाते. या पुजेचा उद्याचा कालावधी काय आहे? त्याची माहिती जाणून घेऊ.

गुरुपौर्णिमा 2024: शुभ काळ

द्रिक पंचांगानुसार गुरुपौर्णिमा २० जुलै रोजी साजरी होत आहे. तर याचा शुभ काळ ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते २१ जुलै २०२४ दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत आहे.

गुरुपौर्णिमा विधी

गुरुपौर्णिमा विधीमध्ये सर्वात आधी सकाळी आवरल्यावर आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा.

आपआपल्या आदर्श व्यक्तीनुसार नावाचा किंवा गुरुमंत्राचा जप करावा.

ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणून गणपतीला ओळखलं जातं.त्यामुळे या मूर्तीची पुजा करा.

तुमच्या गुरुंना या दिवशी फळे, सुंदर वस्त्र, चपला अशा गोष्टी गिफ्ट म्हणून द्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT