Guru Purnima Wishes saam Tv
लाईफस्टाईल

Guru Purnima Wishes: निराकार गुरु गुरु रे निर्गुण..., तुमच्या लाडक्या गुरुजींना WhatsApp, Facebook च्या द्वारे पाठवा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Guru Purnima Puja Vidhi : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते.

कोमल दामुद्रे

Guru Purnima Quotes: हिंदू धर्मात आषाढ महिन्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. या महिन्याची पौर्णिमा तिथी देखील विशेष मानली जाते. आषाढ पौर्णिमा हा सण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

यंदा ही गुरुपौर्णिमा ३ जुलै रोजी साजरी (Celebrate) करण्यात येणार आहे. हा दिवस आपल्या गुरुप्रति आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्याच्यामुळे आज आपल्याला ज्ञानाचे महत्त्व कळले. मग अशाप्रकारे पाठवा तुमच्या लाडक्या गुरुजींना शुभेच्छा !

1. गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गरुःदेवो महेश्वरा, गुरु शाक्षात परब्रम्हा , तस्मै श्री गुरुवे नमः

2. होता गुरूचरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन, गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

3. गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा (Life) पथ हा दुर्गमअवघड डोंगरघाट, गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

4. गुरु हा संतकुळीचा राजा।

गुरु हा प्राणविसावा माझा।

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

5. गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

7. गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

8. होता गुरू चरणाचे दर्शन मिळे आनंदाचे आंदण. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

9. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं (Gold) करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

10. गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

11. गुरू-दक्षिणा काय देऊ, मनात विचार येतो,

तुझ्यासाठी जीव दिला तरी ऋण फेडू शकणार नाही,

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

12. ज्ञानाशिवाय गुरु नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही,

ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरूंची देणगी आहे.

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Harshal Patil: हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी झटकले हात?

Bhandara News: हवामान विभागाकडून भंडाऱ्याला रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी

आता थायलंड आणि कंबोडियामध्ये युध्द, थायलंडचा कंबोडियावर एअरस्ट्राईक

Marathi Language Row: पालघर जिल्हा महाराष्ट्राचा की गुजरातचा? महामार्गावरच्या हॉटेल्सना मराठीचं वावडं

SCROLL FOR NEXT