Gudi Padwa Special Shrikhand Recipe in Marathi Saam tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa Recipe | Shrikhand : गुढीपाडव्याला करा खास श्रीखंड पुरीचा बेत, घरच्या घरी तयार करा गोडाचा पदार्थ

Gudi Padwa Special Shrikhand Recipe in Marathi: सध्या आंब्याचा मौसम सुरु असल्यामुळे आपण आम्रखंडची देखील चव चाखू शकतो. जर तुम्हालाही घरच्या घरी स्वादिष्ट आणि ताजं श्रीखंड बनवायचे असेल तर रेसिपी पाहा.

कोमल दामुद्रे

Homemade Shrikhand Recipe:

गुढीपाडवा हा आनंदाचा, चैतन्याचा आणि उत्साहाचा दिवस. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. हिंदू दिनदिर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा (Celebrate) केला जातो.

यंदा हा पाडवा ९ एप्रिलला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शास्त्रानुसार गुढी उभारल्यानंतर तिला गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो.

गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) सणात चव चाखली जाते ती, श्रीखंड-पुरीची. हल्ली बाजारात श्रीखंडच्या अनेक चवी चाखायला मिळतात. सध्या आंब्याचा मौसम सुरु असल्यामुळे आपण आम्रखंडची देखील चव चाखू शकतो. जर तुम्हालाही घरच्या घरी स्वादिष्ट आणि ताजं श्रीखंड बनवायचे असेल तर रेसिपी (Recipe) पाहा.

1. साहित्य

  • दही - १/२ कप

  • वेलची पावडर - ¼ टीस्पून

  • किसलेले जायफळ- चिमूटभर

  • साखर - १/२ कप

  • गरम दूध - १ चमचा

  • केशर - १२ ते १५ काड्या

  • काजू, बदाम आणि पिस्ता - २ चमचे

2. कृती

  • श्रीखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी दही स्वच्छ कापडात घ्या, त्याला २ तास लटकवून ठेवा.दह्यात असणारे पाणी निघून जाईल.

  • घट्ट झालेल्या दह्याच्या गोळ्याला भांड्यात काढून घ्या. साखर आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  • दह्यात वाटलेली साखर, वेलची पूड घालून फेटून घ्या. त्यात काजू, बदाम आणि पिस्ता घाला.

  • दुसऱ्या भांड्यात दूध आणि केशर मिसळा. तयार केशर दूध मिश्रणात घाला.

  • चांगेल एकजीव झाल्यानंतर फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवा. तयार श्रीखंड पुरीसोबत चवीने खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

डोंबिवलीच्या रील स्टारचा आणखी एक कारनामा; 12 वर्षांनंतर उलगडला खून अन् अपहरणाचा प्रकार

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

बच्चू कडूंच्या हाती 'धनुष्यबाण', कडूंच्या पक्षप्रवेशाचा शिंदेसेनेला फायदा काय?

Aambyachi Kheer Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंब्याची खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT