Manasvi Choudhary
तुरटीला आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानले जाते. पाण्याचा शुद्धीकरण करण्यापासून ते चेहऱ्याची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो.
आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ केल्याने आरोग्याला आणि त्वचेला अनेक फायदे होतात.
तुरटीच्या पाण्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे घाम आणि किटाणू नष्ट होतात आणि शरीर दिवसभर फ्रेश राहते.
त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे आजार दूर होण्यास मदत होते.
नियमितपणे तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची लवचीकता सुधारते, त्वचा सैल पडत नाही.
घामामुळे त्वचेवर होणारी जळजळ, रॅशेस किंवा पुळ्या यांवर तुरटीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या