अभियांत्रिकी पदविका केलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी (CSIR CBRI Recruitment) उपलब्ध आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी यांनी 10 जानेवारी 2024 पासून तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. (latest job update)
एकूण 24 जागांसाठी भरती
इच्छुक उमेदवार 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत संस्थेच्या अधिकृत वेबसाइट cbri.res.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहीर केलेली भरती अधिसूचना तपासली पाहिजे. संस्थेने तांत्रिक सहाय्यकांच्या (Technical Assistant) एकूण 24 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. एकूण पदांपैकी 9 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 7 ओबीसी, 2 एससी, 2 एसटी आणि 4 जागा ईडब्ल्युएससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'हेच' उमेदवार अर्ज करू शकतात
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे (Govt Job 2024) सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असावा. अर्जदाराने किमान 60 टक्के गुणांसह अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. याशिवाय संबंधित पदावर काम करण्याचा 2 वर्षांचा अनुभवही असावा. अर्जदाराचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क 100 रुपये आहे. SC, ST, CSIR कर्मचारी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना नोंदणीसाठी अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. या रिक्त पदाशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू (Govt Job) शकतात.
अर्ज कसा करायचा
संस्थेच्या अधिकृत वेबसाइट cbri.res.in ला भेट द्या. त्यानंतर भरती विभागात जा. तेथे Advt No: CSIR-CBRI 8/2023 वर क्लिक करा. आता अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. नोंदणी करा आणि अर्ज करा.
निवड कशी होईल
निवड (CSIR CBRI Recruitment 2024) लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षा OMR शीटवर असेल आणि एकूण 200 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल. संस्थेने भरती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम जाहीर केला आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. निवडलेल्या उमेदवाराला 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.